श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते
ईद हा मुस्लिम धर्मातील पावित्र्य व मांगल्याचा प्रतिक असलेला सण आहे . आजमितीस कोरोना विषानुने सर्व सण उत्सवावर विरझन घातले आहे. राज्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा व सरकार पूर्ण शक्तीनिशी कोरोनाचा सामना निडरपणे करत आहेत. अशा कोरोना योद्ध्यांसाठी श्रीवर्धन मधील नजीरी बंधूंनी आगळीवेगळी ईद साजरी करण्याचे ठरवले व सोमवारी सर्वत्र ईद साजरी झाल्यानंतर मकसुद नजिरी आणि त्यांचे मोठे बंधू इस्माईल नजिरी व त्यांचे मित्र जुनेद दुस्ते यांनी श्रीवर्धन शहरातील कार्यरत असलेल्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांसाठी मास्क खरेदी केले. शहरातील पोलीस कार्यालय , तहसिल कार्यालय , नगरपरिषद ,भूमिअभिलेख ,व उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन या सर्व कार्यालयात जाऊन मास्क चे वाटप केले. प्रत्येक कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार वितरण करण्यात आले. नजिरी बंधूंच्या या आगळ्यावेगळ्या ईद साजरी करण्याच्या पद्धतीची तहसीलदार सचिन गोसावी यांनी कौतुक केले.
शासकीय यंत्रानेसोबत समजातील सुजाण व दक्ष व्यक्तींनी प्रशासनाची मदत केल्यास कोरोना संकटावर सहजासहजी मात केले जाईल. राज्यातील सद्य परिस्थिती लक्षात घेता कोरोना विरोधातल्या युद्धात जागरूक नागरिकांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. सचिन गोसावी (तहसीलदार श्रीवर्धन )
आज सर्व शासकीय यंत्रणा सर्वसामान्य माणसाला अतिशय चांगली सेवा देत आहे त्यामुळे त्या सेवा देणाऱ्या व्यक्तीं विषयी आपले काही तरी दायित्व आहे त्या नुसार आम्ही दोन्ही बंधू नी ईद निमित्त सर्व यंत्रणेत कार्यरत कर्मचारी वर्गासाठी मास्क वितरणाचा निर्णय घेतला आहे . घराच्या सर्व व्यक्तींनी आमच्या निर्णयाचे स्वागत केले यांचा आनंद आहे .....मकसूद नजिरी (रहिवाशी श्रीवर्धन )
Post a Comment