तळा (किशोर पितळे)
रायगड चे पालकमंत्री अदिती ताई तटकरे यांच्या प्रेरणेने तळा येथील सुपुत्र व पुणा स्थित उद्योजक तथा समाजसेवक प्रकाश गोपाळ जाधव यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवूनमातोश्री लक्ष्मी गो.जाधव हिच्या स्मृती प्रित्यर्थ कोरोना विषाणूजन्य ससंर्ग संक्रमण रोखण्यासाठी तळा तालुक्यातील जनतेला याचा प्रादुर्भाव होऊ नये या उदात्त हेतूने तळा पोलीसठाणे, पंचायत समिती,सर्व ग्रामसेवक, महसुली विभाग व नागरीकांना मास्क, सँनीटायझर प्रकाश जाधव यांच्या हस्ते वाटप केले.निरंतर अहोरात्र मेहनत घेऊन कोरोना साखळी तोडण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहेत याचा जास्त ताण पोलीसप्रशासन महसुली विभागावर येत आहे.पंचायत समिती,महसूल विभाग या शासकीय कर्मचारी योध्दांचा संपर्क मोठ्या प्रमाणावर येत असल्याने संरक्षण व्हावे यासाठी यांनी छोटासा प्रयत्न केला आहे. नगरसेवक मंगेश शिगवण यांच्या विशेष सहकार्याने पत्रकार किशोर पितळेयांच्या सहाय्याने करण्यात आले.
Post a Comment