मुंबई : राज्यासह सुरु झाला असून देशभरात चौथा लॉकडाऊन या लॉकडाऊनची नियमावली (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines) आता राज्य सरकारने जाहीर केली आहे. कोणत्या झोनमध्ये काय सुरु राहील आणि काय बंद असेल, हे यामध्ये सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र सरकारने 17 मे रोजी पत्रक काढून लॉकडाऊन 4 ची घोषणा केली. त्यानंतर केंद्रानेही त्याच दिवशी लॉकडाऊन वाढवला. मात्र केंद्राने या चौथ्या लॉकडाऊनची नियमावली ठरवण्याचे अधिकार राज्यांना दिले होते. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नियमावली जारी केली आहे. आता हे नियम 22 मे पासून 31 मेपर्यंत लागू राहतील.
चौथ्या लॉकडाऊनची नियमावली जाहीर
चौथा लॉकडाऊन 31 मे पर्यंत असेल
22 मेपासून लॉकडाऊनचे नवे नियम लागू होऊन ते 31 मेपर्यंत राहतील.
सर्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक बंद. केवळ देशांतर्गत अत्यावश्यक सेवेसाठी हवाई वाहतूक सुरु राहील
मेट्रो रेल्वे बंद राहतील
शाळा, कॉलेज, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्र, शिकवणी वर्ग बंद राहतील. केवळ ऑनलाईन वर्ग सुरु राहतील
पुढील गोष्टींना बंदी कायम
1. डोमेस्टिक आणि आंतरराष्ट्रीय विमाने सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद राहणार
2. मेट्रोसेवा बंद राहणार
3. शाळा, कॉलेज, शिक्षण संस्था, कोचिंग क्लास बंद, (ऑनलाईन शिक्षणासाठी प्रोत्साहन)
4. हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर आदरातिथ्य सेवा बंद राहणार.
(केवळ विमानतळ, रेल्वे स्थानक आणि बस डेपोमधील उपहारगृहे, तसेच पोलीस, आरोग्य अधिकारी, सरकारी अधिकारी, पर्यटकांसह अडकलेले मजूर, क्वारंटाईन भागातील उपहारगृहे सुरु)
5. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क, ऑडीटोरीअम, थेटर, बार बंद राहणार
6. सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी
7. सर्व धार्मिक स्थळे बंद राहणार
- रात्री सात ते सकाळी सात वाजेपर्यंत सक्त संचारबंदी, जीवनावश्यक सेवा वगळता
- 65 वर्षांवरील नागरिक, इतर व्याधी जडलेल्या व्यक्ती, गर्भवती आणि दहा वर्षांखालील मुले यांनी अत्यावश्यक सेवा आणि आरोग्यविषयक कारण वगळता घराबाहेर पडू नये
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करुन लॉकडाऊन 4 ची घोषणा केली होती. त्यानुसार सर्व राज्यातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आलं आहे. दरम्यान यापूर्वी महाराष्ट्र, पंजाब आणि तामिळनाडू सरकारने लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली होती.
लॉकडाऊन कसा वाढत गेला?
पहिला लॉकडाऊन - 25 मार्च ते 14 एप्रिल (21 दिवस)
दुसरा लॉकडाऊन - 15 एप्रिल ते 3 मे (19 दिवस)
तिसरा लॉकडाऊन - 4 मे ते 17 मे (14 दिवस)
चौथा लॉकडाऊन - 18 मे ते 31 मे (14 दिवस)
देशात 25 मार्चपासून पहिला लॉकडाऊनचा टप्पा सुरु झाला. 21 दिवसांचा पहिला टप्पा 14 एप्रिलला संपला. दुसरा लॉकडाऊन 15 एप्रिल ते 3 मे असा होता. तिसरा लॉकडाऊन 3 मे रोजी सुरु होऊन 17 मेपर्यंत चालला. 17 मेनंतर चौथ्या लॉकडाऊनबाबत प्रत्येक राज्याने आढावा घेऊन सूचना द्यावा, असे पंतप्रधानांनी सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगितले होते. (Maharashtra Lockdown 4.0 Guidelines)
Post a Comment