रायगडात दोन महिन्यांत एसटीचे 12 कोटींचे नुकसान : राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांची माहिती
रायगड प्रतींनिधी
लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर एसटी ‘अटी आणि शर्तीं’वर धावायला लागली असली तरी बंदच्या या काळात रायगड विभागात एसटीचे 12 कोटींचे नुकसान झाले असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाच्या विभागीय नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे एसटीदेखील बंद होती. दोन महिन्यांनंतर रायगडात ती शुक्रवार (22 मे) पासून धावायला लागली आहे. सुरुवातीला 324 फेर्यांचे नियोजन करण्यात आले आहे. प्रवासी गर्दी पाहून मुख्य रस्त्यांवर एसटी धावणार आहे. शुक्रवारी पहिल्याच दिवशी केवळ 72 फेर्या झाल्या. प्रवासी अजूनही बाहेर पडलेले नाहीत. त्यामुळे एसटीला अल्पप्रतिसाद मिळत आहे. बंदच्या काळात एसटी बंद असल्यामुळे रायगड विभागाला 12 कोटींहून अधिक तोटा झाला आहे.

Post a Comment