स्वदेस फाउंडेशनच्या वतीने N-95 मास्क, पी पी ई किट, पल्स ऑक्सी मिटर, थर्मल स्कॅनरचा रायगड जिल्हा प्रशासनाला पुरवठा.


स्वदेस फाउंडेशनच्या वतीने करोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी  मास्क, पीपीई किट, थर्मल स्कॅनर व पल्स ऑक्सिमीटर अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे यांच्याकडे सुपूर्द

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह

स्वदेस फाउंडेशनच्या वतीने कोविड-19 चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत.  त्याचाच एक भाग म्हणून आज जिल्हा रुग्णालयाला  50 हजार ट्रिपल लेयर मास्क, 1 हजार N-95 मास्क, 750 पी पी ई किट, 20 पल्स ऑक्सी मिटर,  50 थर्मल स्कॅनरचे हस्तांतरण स्वदेश फाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार व समन्वयक नयन पोटले यांच्या हस्ते अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अनिल फुटाणे, प्रशासकीय अधिकारी पी. डी धामोडा, औषध निर्माता श्री.कदम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम समन्वयक सुनिल चव्हाण  यांच्याकडे जिल्हा सामान्य रुग्णालय,रायगड-अलिबाग येथे सुपूर्द करण्यात आले. 
तसेच स्वदेस फाउंडेशनच्या वतीने आतापर्यंत एकूण 1 लाख 50 हजार ट्रिपल लेयर मास्क, 6 हजार N-95 मास्क, 3 हजार 200 पी पी ई किट, 20 पल्स ऑक्सी मिटर,  52 थर्मल स्कॅनरचा  रायगड जिल्हा प्रशासनाला पुरवठा करण्यात आला आहे.
करोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी स्वदेस फाउंडेशन करीत असलेल्या कामाचे कौतुक करून स्वदेस फाउंडेशनचे प्रमुख रॉनी स्क्रूवाला व झरीना स्क्रूवाला, मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश वांगे, स्वदेश फाउंडेशनचे महाव्यवस्थापक तुषार इनामदार व संपूर्ण स्वदेस टीमचे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी विशेष आभार मानले. 
 राष्ट्रीय आपत्तीच्या या काळात दानशूर व्यक्तींनी, संस्थांनी केलेल्या मोलाच्या सहकार्याबद्दल जिल्हाधिकारी  श्रीमती निधी चौधरी यांनी त्या सर्व दानशूर  व्यक्तींचे,संस्थांचे आभार मानले असून जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनी, कंपन्यांनी, व्यक्तींनीही मदतीसाठी असेच पुढे यावे, असे आवाहन केले आहे. 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा