पुढील २१ दिवस घरातच रहा, तुमचं बाहेर टाकलेलं एक पाऊल कोरोनाला तुमच्या घरात आणेल. -नरेंद्र मोदी


प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनाचं संकट उद्भवल्यानंतर एकाच आठवड्यात सलग दुसऱ्यांदा देशाला संबोधित करताना मोठी घोषणा केली. मोदी म्हणाले, 'जनता कर्फ्यूनं दाखवून दिलं की, देशावर ज्यावेळी कोणतही संकट येत तेव्हा संपूर्ण देश एकजुट होतो. करोनासारख्या महारोगानं जगातील सामर्थ्यशाली राष्ट्रांनाही हतबल करून ठेवलं आहे. त्या राष्ट्रांकडं साधन नाहीत, असं नाही. पण, हा आजार इतक्या वेगानं पसरत आहे की, तयारीच करता येत नाही. त्यामुळे आज रात्रीपासून संपूर्ण देश लॉकडाउनमध्ये जात आहे,' अशी घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली. हा लॉकडाउन ‍21 दिवसांचा असेल.आज मध्यरात्री १२ वाजल्यापासून १४ एप्रिलपर्यंत संपूर्ण देशात लॉकडाउन असणार आहे.  जिथे असाल तिथेच रहा, पंतप्रधानांचे आवाहन,  कोरोनाला रोखण्यासाठी पुढील २१ दिवस घरातच रहा, तुमचं बाहेर टाकलेलं  एक पाऊल कोरोनाला तुमच्या घरात आणेल, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केली भीती. 
को- कोई
रो - रोड पर
ना - निकले
कोरोनाचा प्रसार वेगाने वाढतोय, जनतेने सहकार्य करावं असे भावनिक आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला केलं आहे.

पूर्ण विडियो पाहण्यासाठी लिंक वर क्लिक करा



Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा