संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा शहरातील साळीवाडा भागात चोरट्याने बंद घर फोडून पोलीसांवर दहशत निर्माण करण्याची घटना घडली. याबाबत सविस्तर हकीगत अशी की , साळीवाडा भागात रहाणारे कर्णिक गुरुंजींचे बंद घराचा चोरट्यानी मागचा दरवाजाची कडी तोडून घरातील गॅस शेगडी, सीलेंडर व रेग्युलेटर, इनन्हर्टर बॅटरी व मशीन, फिलीप्स कंपनीचा डी.व्ही.डी. प्लेअर, होम थीएटर, मिक्सर व कॅमेरा अशा महच्वाच्या वस्तू चोरट्यानी लंपास केल्याचे तक्रार अर्ज निलेश रमेश कर्णिक यानी म्हसळा पोलीसांत दिला आहे. अर्जदार निलेश याचा भाऊ आमित हा काही कामानिमित्त शुकवार दि. १३ रोजी घरी आला असता घराचा मागचा दरवाजा उघडा असलेला दिसल्यावर त्याने भावाला कळविल्याचे समजते. भाऊ निलेश याने आज दि.१५ रोजी घरफोडीच्या घटनेचा रितसर तक्रार अर्ज म्हसळा पोलीसांत दिला आहे. कर्णिक यानी जुलै २०१९ मध्येही आमच्या घराची घरफोडी होऊन चांदीच्या वस्तू चोरटयानी लंपास केल्या होत्या असा उल्लेख आपल्या तक्रारीत केला आहे.. विशेष म्हणजे कर्णिक यांचे घर म्हसळा पोलीस स्टेशन पासून केवळ १०० मीटर अंतरावर आहे.या बाबत म्हसळा पोलीसांत चौकशी केली असता सायं. ७ वाजेपर्यंत गुन्ह्याची नोंद केली नसल्याचे सांगण्यात आले.
"घरफोडी बाबत साळीवाडा येथील कर्णिक यांचा तक्रार अर्ज आला आहे, प्रभारी अधिकारी साप्ताहिक सुट्टीवर आसल्याने उद्या त्यांचे समोर अर्ज ठेवला जाईल व गुन्हा रितसर नोंदविला जाईल."
सुर्यकांत जाधव, ठाणे अंमलदार, म्हसळा पोलीस स्टेशन.
"सन २०१९ मध्ये जुलै महिन्यात ३ घरफोडया, ऑगस्ट मध्ये कोंझरी गावात ३ते ४ बंद घरे फोडणे व डिसें मध्ये पाभरा येथील घरफोडी , या सर्वांचा तपास अद्यापही झाला नसताना म्हसळा शहरात आजची घटना शहरवासीयांसाठी वाईट आहे, आजही ग्राम पोलीस म्हणून ओळखणाऱ्या पोलीस पाटीलांची तालुक्यात १२ पदे रिक्त आहेत, ती गावे पुढील प्रमाणे : कुडतोडी, ढोरजे,मोरवणे, देहेन, वांगणी,भापट, ताम्हने करंबे, कोलवट, चिरगाव, भेकऱ्याचा कोंड,रातीवणे, रोहिणी तर तालुक्याचे लोकसंखेच्या निकषाने पोलीस अधिकारी- कर्मचारीही तुटपुंजे आहेत"
महादेव पाटील, माजी सभापती तथा तालुका प्रमुख,शिवसेना.
Post a Comment