वसंतराव नाईक महाविद्यालयात कै. यशवंतराव चव्हाण जयंती साजरी

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
म्हसळा  येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला वाणिज्य व बॅरिस्टर अंतुले ए आर अंतुले विज्ञान महाविद्यालयात सह्याद्रीच्या कुशीत जन्माला येऊन हिमालयाची उंची गाठलेल्या देशाचे उपपंतप्रधान संरक्षण मंत्री अर्थमंत्री गृहमंत्री आणि महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री कै. यशवंतराव चव्हाण यांची 107 वी जयंती चैतन्यमय वातावरणात साजरी करण्यात आली कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते महाविद्यालयातील वरिष्ठ प्राध्यापक आणि वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक एम एस जाधव यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात सर्वप्रथम सांस्कृतिक विभागाचे  प्रमुख  प्राध्यापक  शिरीष समेळ यांनी प्रास्ताविक सादर केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी कै. यशवंतराव चव्हाण यांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला त्यामध्ये त्यांनी असे सांगितले की  भारतातील आणि महाराष्ट्रातील लोकांना समजून घेणारा बुद्धिमत्तेने विचाराने आजाराने हिमालयाची उंची घातलेला नेता म्हणून यशवंतराव चव्हाण यांचे कार्य कर्तुत्व मोठे होते यशवंतराव चव्हाण हे एक साहित्यिक व सांस्कृतिक नेते होते त्यांनी महाराष्ट्राच्या शिक्षणाचा विकास घडवून आणण्यात मोलाची भर घातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  मराठवाडा विद्यापीठ  शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांची निर्मिती  त्यांच्याच काळात झाली त्यानंतर प्प्राध्यापक एम एस जाधव यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार  अर्पण करून महाविद्यालयाच्या वतीने अभिवादन केले त्यानंतर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी प्रतिमेस पुष्पे अर्पण करून यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन केले महाविद्यालयात द्वितीय वर्ष कला शाखेत शिकणारी कुमारी अर्चना  येल्वे या विद्यार्थिनीने यशवंतराव चव्हाण आणि त्यांचे कृषी अर्थशास्त्र या विषयावर मनोगत मांडले त्यामध्ये तिने यशवंतराव चव्हाण यांनी  शेतीच्या विकासासाठी महाराष्ट्रात कृषी विद्यापीठे स्थापन केली कोल्हापूर पद्धतीचे बंधारे  बांधले आणि त्याची प्रसिद्धी केली   तसेच सहकार चळवळी बाबत चव्हाण साहेबांनी केलेल्या कार्याची माहिती दिली कार्यक्रमाच्या  शेवटी आभार प्रदर्शन झाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील ग्रंथपाल प्राध्यापक आर एस माशाले आणि कुमारी हिंदवी वाजे यांनी सहकार्य केले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा