सलग सुट्टयामुळे श्रीवर्धन दिवेआगरला पर्यटक वाढले : म्हसळ्यातील ट्रॅफिक कोंडीला लक्षात ठेऊन गेले.


संजय खांंबेटे : म्हसळा प्रतिनिधी
शनिवार, रविवार, होळी, धुलिवंदन अशा सलग सुट्टयाांमुळे श्रीवर्धन- दिवेआगर -श्री क्षेत्र हरीहरेश्वर फिरायला येणार्‍यांची संख्या प्रंचड वाढल्याने श्रीवर्धन दिवेआगरचे पर्यटकांच्यात प्रचंड वाढ झाली. याच वेळी मात्र म्हसळा करानी अरूंद बाजारपेठेंत होणाऱ्या वाहतुक कोंडीत सुद्धा येणाऱ्या जाणाऱ्या गाडया मापून आनंद लुटला.यावेळी पर्यटकांच्यात सांगली, सातारा, कोल्हापूर,पुणे, नगर, परिसरांतील पर्यटकांची गर्दी मोठया प्रमाणात होती. ४ दिवसाच्या पर्यटनासाठी मुरुड, श्रीवर्धन,दिवेआगर या समुद किनाऱ्यालगतच्या पर्यटनाला विशेष प्राधान्य दिले.शासनाने सरकारी कार्यालयात पाच दिवसांचा आठवडा केल्याने दर शनिवार व रविवार आता सरकारी कार्यालये बंद राहणार आहे. या दोन सुट्टयांसोबत होळी व धुलिवंदनाची देखिल सुट्टी असल्याने सलग सुट्टयां निमित्त फिरायला जाण्याचे नियोजन करुन पर्यटक मोठ्या संख्येने खासगी वाहनांमधून फिरायला घराबाहेर निघाल्याने पर्यटकांच्या संखेत मोठया प्रमाणात वाढ झाली.
म्हसळ्यातील वाहतुक कोंडी पर्यटकांच्या रहाते लक्षात
श्रीवर्धन, श्री क्षेत्र हरीहरेश्वर, दिवेआगर सुवर्ण गणेश मंदीर, आंतरराष्ट्रीय दर्जाचे दिघीबंदर, तुरूंबाडी येथील दास प्रकल्प येथे जाणारी सर्व व्यापारी,पर्यटकांची वाहने म्हसळा शहरांतील रस्ता वापरणे पसंत करतात ,G.P.S. प्रणालीही याच मार्गा बाबत मार्गदर्शन करते.अधीच अरूंद असलेल्या रस्त्यांत दोन बस समोरासमोर आल्यावर होणाऱ्या कोंडीमुळे, पर्यटक, स्थानिक वाहातुकदार, पादचारी याना वाहतुक कोंडीचा फटका बसतो. सलग सुट्टयांच्या कालावधीत टूरीस्ट बस, मिनी बस , टेंपो ट्रॅव्हलर, जीप, कार प्रंचड संखेने आली होती.
फोटो: आज म्हसळा शहरात झालेली वाहतुक कोंडी छाया चित्रांत दिसत आहे, म्हसळा पोलिसांचे गाडीलाही वाहतुक कोंडीने त्रासलेले दिसत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा