श्रीवर्धन नगरपरिषदे कडून भाजी मार्केट चे विकेंद्रीकर ; मच्छीमार्केट दुसरीकडे स्थलांतरित



श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

श्रीवर्धन नगरपरिषदेने कोरोना विषाणू चा संसर्ग टाळण्यासाठी व भाजीमार्केट मध्ये होणारी अवाजवी गर्दी टाळण्यासाठी  भाजी मार्केटचे विकेंद्रीकरण केले आहे .नगरपरिषद शाळा नंबर एक व अंजुमन हायस्कुल या दोन ठिकाणी भाजी मार्केट वर्ग करण्यात आले आहे .नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांनी काल दिवसभरात दोन्ही शाळांच्या प्रांगणात भाजी विक्रेता  व खरेदीदार व्यक्ती यांच्यात सुरक्षित अंतर राहील या पद्धतीने आखणी केली .दोन भाजी विक्रेत्या मध्ये मुबलक अंतर ठेवण्यात आले आहे .त्या कारणे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यास निश्चितच मदत होईल .नगरपरिषद शाळा नंबर एक हे श्रीवर्धन चे मध्यवर्ती ठिकाण आहे त्या कारणे श्रीवर्धन शहर व आजूबाजूस असलेल्या ग्रामीण भागातील लोकांना भाजी खरेदीसाठी सोईस्कर ठरत आहे .शाळेच्या मुख्य रस्त्या लगत गणेश आळी , पेशवे आळी , कसबा पेठ , परीट आळी , असल्याने शाळा नंबर एक मधील भाजी  खरेदीला जनते कडून चांगला प्रतिसाद मिळत आहे .अंजुमन हायस्कूल मधील भाजी खरेदी  दांडा  , प्रभू आळी , गन्द्रे नाका व मुस्लिम मोहल्ला येथील लोकांना सुलभ ठरत आहे .या पुर्वी जुन्या भाजी मार्केट मध्ये जागे अभावी मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती त्या कारणे कायदा सुव्यवस्था व आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती त्या कारणे नगरपरिषद , तहसिल कार्यालय व पोलीस प्रशासन यांनी भाजीमार्केट चे विकेंद्रीकरण केले आहे .श्रीवर्धन मधील जनतेला घरी किराणा माल उपलब्ध  करून देण्यासाठी प्रशासनाने तयारी करून किराणा दुकानदार यांची यादी तयार करून  सोशल मीडियावर सर्वत्र पाठवली आहे .

श्रीवर्धन शहराचे मच्छीमार्केट रवींद्र राऊत हायस्कूल च्या मैदानात स्थलांतरित करण्यात आले आहे .हायस्कूल चे मैदान प्रशस्थ असल्याने मच्छी विक्रेते  व खरेदीदार यांच्या योग्य अंतर राहून कोरोना चा प्रादुर्भाव रोखला जाईल .

भाजी मार्केट चे विकेंद्रीकरण गर्दी रोखण्यासाठी आवश्यक होते .नगरपरिषद शाळा नंबर एक व अंजुमन दोन्ही शाळेचे मैदान मोठे आहेत .तसेच प्रत्येक विक्रेत्या मधील सुरक्षित अंतर ठेवले आहे .लोकांनी  सहकार्य करावे ही विनंती आहे ......किरणकुमार मोरे (मुख्याधिकारी श्रीवर्धन )

जनतेला जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी मोकळीक दिली आहे मात्र कायद्याचे उल्लंघन झाल्यास तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत .लोकांनी कायद्याचे पालन करून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे ...प्रमोद बाबर (पोलीस निरीक्षक श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा