तळा तालुक्यात जनता कर्प्यूला उत्तम प्रतिसाद बाजारपेठेत शुकशुकाट.पाळीव प्राण्यांंनी देखील कोरोना पासून बचावासाठी पाळला बंद
तळा (किशोर पितळे)
सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने भारतातही शिरकाव केले असून ग्रामीण भागात तो पसरू नये यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच पाश्वभूमीवर कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व राज्याचे मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी रविवार २२मार्च सकाळी ७ते रात्री९पर्यंत कमीत कमी संपर्कात रहाण्याचे आवाहन केले असून त्याची अंमलबजावणी शासनाने देशपातळीवरून अगदी संपूर्ण खेडेगावात वाड्या वस्ती आदिवासी वाडी पर्यंत कोरोना विषाणूजन्य संसर्ग रोखण्यासाठी तळा तहसील कार्यालयातून,स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत), नगरपंचायत,पोलीस, यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली होती त्याप्रमाणे प्रत्येक जण काळजी व दक्षता घेऊन घरातच बसले असल्याचे निदर्शनास आले आहे. मानव जातीसह अगदी पाळीव प्राणी गुरे ढोरे, कुत्रे देखील यांनी या संसर्गाची धास्ती घेतली असून दररोज वर्दळीत गर्दीत यांची असणारी वळवळ या प्राण्यांनी आज मात्र विसावली असल्याचे दिसून आले.भयाण स्मशानात शांतता आजपर्यंत कधीच जाणवली नव्हती.देशव्यापी राज्यव्यापी,बंदला इतका प्रतिसाद मिळत नाही. या महामारीच्या कोरोना विषाणू संसर्ग रोगाची धास्तीने सर्वजणघरातचराहिलेआहेत.भाजीची दुकाने, मेडिकल स्टोअर,किराणा दुकाने,चहाची टपरी, रिक्षा, एस टी बस इतर वाहतुकीची दळणवळणसाधने संपूर्ण ढप्प झालेला व्यवहार आज जनता कर्प्यूने बाजारपेठेत पाळलेला पहायला मिळाला आहे. प्रशासनाकडून बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवून असून विलगीकरणासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आपली जबाबदारी कर्तव्य चोखपणे पार पाडीत असल्याचे दिसत आहेत.
Post a Comment