पाभरे पारोडा येथे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

म्हसळा तालुक्यातील पाभरे येथे 12 मार्च रोजी शिवजयंती मोठ्या उत्साहात व आनंददायी वातावरणात साजरी करण्यात आली.
  पाभरे गावातील कुणबी, सुतार, कुंभार व नाभिक असे चार समाज एकत्र येऊन पारोडा येथे दरवर्षी शिवजयंती विविध कार्यक्रमांनी साजरी करतात. यावेळी चारही समाज एकता व बंधुभाव जपत छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेले होते. शिवमय विचारांनी गावातून दिमाखदार मिरवणूक काढतात. रंगीबेरंगी पोशाख करून फेटे बांधून वाजत गाजत मिरवणूक काढून लहान थोर या उत्सवाचा आनंद लुटतात. यावेळी गावातील पुरुष, महिला, युवक, युवती या शिवजयंती उत्सवात सहभागी झाले होते.
शिवजयंती निमित्ताने श्री कालभैरव क्रिकेट संघाच्या वतीने श्री सत्यनारायण महापूजा आयोजित केली जाते तसेच हरिपाठ, भजन, आरती, व इतर विविध कार्यक्रमांनी शिवजयंती साजरी केली असल्याची माहिती मंडळाच्या सदस्यांनी सांगितली.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा