म्हसळा तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतीतून निर्जंतुकी करणासाठी झाली फवारणी

 
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, ग्रामविकास विभाग व आरोग्य विभागाच्या समन्वयाने तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतीतील सर्व महसुली गावे, वाडया वस्तीमध्ये जंतुनाशक औषध फवारणी करण्यात आल्याने तालुक्यातील जनता सुखावली आहे तालुक्यातील आंबेत, रोहिणी,आडी महाड खाडी, भेकरेचा कोंड, खारगाव बू., पाभरे, निगडी, कांदळवाडा, खरसई, मेंदडी, रेवली, वरवटणे, गोंडघर, खारगाव खुर्द, कणघर, लेप, कोळे,नेवरूळ, जांभूळ, घूम,साळविंडे, मांदाटणे, ठाकरोली,कोळवट,केलटे,तोंडसुरे,घोणसे, खामगाव, कुडगाव, संदेरी, लीपणी वावे, चिखलप,तोराडी,पांगळोली, वारळ, फळसप, तुरुंबाडी, काळसूरी, देवघर या ग्रामपंचायततून फवारणी झाल्याचे ग्रामविकास अधिकारी सुनील गायकवाड यानी सांगितले.
अत्याधुनिक यंत्राची जंतुनाशक क्षमता २०० लिटरपासून १००० लिटरपर्यंत होती टाकी मध्ये २०० लिटर पाण्यामध्ये १ लिटर या प्रमाणात सोडियम हैड्रो क्लोराइड , क्लोरीवॅट व Secure मिसळून त्याची फवारणी केल्यामुळे पृष्ठ भागावरील व हवेमधील जंतू नष्ट करण्यास मदत होते असे सांगण्यात आले. काही ग्रामपंचायती मध्ये सार्वजनिक गटारे आणि परसावांमधून जंतूनाशक धुराची फवारणी केली. शिवाय गावात,चौकात ठिकठिकाणी कोरोना व्हायरस संसर्गाची पोस्टर्स लावण्यात आली आहेत.नागरिकांना घराबाहेर पडू नये यासाठी आवाहन ही करण्यात येत आसल्याचे गायकवाड यानी सांगितले.

"तालुक्याच्या ग्रामीण भागात सर्वत्र निर्जंतुकी करणासाठी फवारणी झाली तरी म्हसळा नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरातील पूर्ण भागात अद्यापही फवारणी झाली नसल्याने शहरातील नागरीकांचा नाराजीचा सूर आहे"

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा