वेळास : पुष्कर रिळकर
वेळास श्रीवर्धन तालुक्यातील एक छोटेसे गाव या गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी भौतिक द्रुष्ट्या नियोजनबद्ध विकासाचा आराखाडा तयार करुन त्या द्रुष्टीने गेल्या वर्षी निवडुन आलेले सरपंच विकासाचा अजेंडा घेवुन काम करीत आहेत.
वेळास श्रीवर्धन तालुक्यातील एक छोटेसे गाव या गावाच्या वैभवात भर घालण्यासाठी भौतिक द्रुष्ट्या नियोजनबद्ध विकासाचा आराखाडा तयार करुन त्या द्रुष्टीने गेल्या वर्षी निवडुन आलेले सरपंच विकासाचा अजेंडा घेवुन काम करीत आहेत.
सरपंचांना निवडुन येवुन १ वर्ष पुर्ण होत आहे. १ वर्षामध्येच त्यांनी गावाला दिलेला शब्द "प्रत्येकाच्या घरामध्ये नळ"पुर्ण होणार आहे.त्या साठी शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा करुन ३६ लाखांची पाणी योजना गावात राबवली जात आहे.त्याच बरोबर १४ वित्तआयोगातुन गावातील रस्ते,स्मशानभुमी अशी एकुण १३ लाखांची कामे पुर्ण केली आहेत.त्याच बरोबर ग्रामनिधीतुन गावातील अंगणवाड्यामध्ये गँस शेगडी व खाऊचा वाटप,अपंगांसाठी वेगवेगळ्या योजनांअंतर्गत निधी वाटप,गावातील एकुण १५ महिला बचत गटांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करुन गावाला विकासाच्या दिशेने घेवुन जात आहेत.
तालुका क्रुषी कार्यालयाअंतर्गत एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रम पाणलोट समितीकडुन निधी मंजुर करुन १५ महिला बचत गटांना व ६ भुमीहीन लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे.
या सर्व विकासाभिमुख प्रवाहाचे उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व सर्व ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे असे सरपंच श्री.आशुतोष पाटील म्हणाले.
"भविष्यात महिला बचत गटांसाठी व्यवसाय प्रक्षिक्षण केंद्र,युवकांसाठी व्यायामशाळा व वेळास आगर ला लाभलेल्या समुद्रकिनार्याचे सुशोभीकरण करुन आपला गाव पर्यटन स्थळ म्हणुन विकसित करण्याचा ध्येय आहे." -श्री.आशुतोष पाटील, सरपंच
Post a Comment