कोरोना च्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन जिल्हा रुग्णालयाची पालकमंत्री आदिती तटकरेंनी केली पाहणी

श्रीवर्धन : प्रतिनिधी

महाराष्ट्रात झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी प्रशासन दररोज वेगवेगळी पावले उचलत आहे. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी आज श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील विलगीकरण कक्षाची पहाणी केली त्याचबरोबर तेथील उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करून येथील सोयी सुविधा,समस्या जाणून घेतल्या.यासोबतच श्रीवर्धन नगरपरिषद येथे पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली येथील नगर परिषद सदस्य,शासकीय अधिकारी व काही व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून विषाणू संसर्ग टाळण्यासाठी व उद्भवलेल्या परिस्थितीशी कसा सामना करायचा याविषयी चर्चा झाली. त्याचबरोबर जनतेने घराबाहेर पडू नये, परदेशातून किंवा पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर या भागातून काही नागरिक आले असल्यास त्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला कळविण्याचेही आवाहन केले.कोरोनाचा सामना आपण सर्वांनी एकत्र येऊन मिळून करूया असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा