डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानची म्हसळयात स्वच्छता मोहीम


● स्वच्छतेसाठी हजारो श्री सदस्यांचे हात सरसावले

● एक ग्रामीण रूग्णालय, दोन प्राथमिक आरोग्य केंद्र, पाच मंदिरे केली स्वच्छ

● सहा टन पेक्षा जास्त कचरा केला गोळा 

◆ डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सेवाभावी कार्य कौतुकास्पद - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
 
  महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही सांप्रदाय प्रसारक, पर्यावरण प्रेमी आणि स्वच्छता दुत म्हणून नावलौकिक असणारे डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणचे माध्यमातून महाराष्ट्र भूषण डॉ.नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त म्हसळा येथे बैठक सांप्रदायाचे श्री सदस्यांनी स्वच्छता मोहीम हाती घेऊन शहरात सार्वजनिक ठिकाणी व देवालयांची साफसफाई केली. धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या मार्फत प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, उमेश धर्माधिकारी, राहुल धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम करण्यात आली. मोहिमेमध्ये म्हसळा ग्रामीण रुग्णालय, मेंदडी, खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र, शहरातील देवदेवतांची मंदिरे अशा ठिकाणी जाऊन हजारो श्री सदस्यांनी स्वच्छतेची सेवा केली. विविध भागातून  6 टनहुन अधिक पेक्षा कचरा गोळा करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावली. स्वच्छता मोहीमेत राजीप कृषी व पशुसंवर्धन सभापाती बबन मनवे, समाजसेवक बाळशेठ करडे, योगेश करडे, माझी सभापती महादेव पाटील, निकेश कोकचा, सुनिल उमरोठकर, डॉ.एस.के.मोरे, डॉ.प्रतिक पांगारे, सरपंच राजेश्री कांबळे, उद्योजक महेंद्र पारेख आदी मान्यवरांनी सहभाग घेतला होता.
    स्वछता मोहिमेमध्ये म्हसळा तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, मेंदडी व खामगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच म्हसळा शहारतील धावीरदेव मंदिर, शंकर मंदिर, गणेश मंदिर, राधाकृष्ण मंदिर, श्रीराम मंदिर अशा पाच मंदिरांची स्वच्छता करण्यात आली. ही स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे सदस्य यांनी सकाळी 7 वाजल्यापासून स्वच्छतेला सुरुवात केली. स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे 723 सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.129800 चौरस मिटर परिसरातून 6 टन पेक्षा जास्त कचरा गोळा करून या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली. 
प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असलेल्या सेवाभावी कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिष्ठानकडून स्वच्छता करण्यासाठी लागणारे आवश्यक सर्व साहित्य पुरविण्यात आले होते. तालुक्यात प्रथमच प्रतिष्ठानने मंदिरे स्वच्छ केल्याने मंदिरांचे विश्वस्थ व भक्तगण प्रतिष्ठानचे विशेष भरभरून कौतुक करीत आहेत. 
या प्रतिष्ठानने तालुक्यात या प्रतिष्ठानने वेळोवेळी समाजोपयोगी उपक्रम राबवत शासनाच्या कार्यक्रमाला सातत्याने मदत करत स्वच्छते पासून ते वृक्ष रोपणापर्यंत अशा विविध शासनाच्या उपक्रमात हे प्रतिष्ठान सक्रीय आहे. वनराई बंधारे बांधण्यासाठी देखील प्रतिष्ठानने विशेष परिश्रम घेऊन बंधारे पूर्ण केले या बंधाऱ्यामुळे आज पाणीसाठा चांगल्या प्रमाणात वाढला आहे. अशा विविध उपक्रमांमुळे तालुक्यात प्रतिष्ठानची एक आदर्शवत शिस्त तालुक्याला लागली आहे. त्यामुळे प्रतिष्ठानचा कार्य आज सर्वांना आदर्श व स्फूर्तीदायक ठरत आहे.
 
      डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान नेहमीच समाजोपयोगी उपक्रम राबवत शासनाच्या कार्यक्रमाला सातत्याने मदत करीत आहे. म्हसळा तालुक्यात स्वछता अभियाना बरोबरच वृक्ष लागवड, पाणी आडवा पाणी जिरवा करिता वनराई बंधारे बांधणे, पाणपोई उभारणी, सुबक एसटी बस थांबे, पाझर तलावातील गाळ उपसा, शासन स्तरावर मिळणारे जेष्ठ नागरिक, वय अधिवास आणि जातीचे दाखले, पोलीस ठाण्याला आवश्यक असणारे ब्यारिकेट असे विविध उपक्रम राबवत तालुक्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून महत्त्वाचे आणि सेवाभावी कार्य, वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविण्यात येत असल्याचे म्हसळा श्रीसमिती प्रमुख महेश पवार यांनी माहिती देताना सांगितले. 

डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे कार्य कौतुकास्पद - जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे
     डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून श्री सदस्यांच्या श्रमदानातून व सेवाभावी सहकार्यातून वेगवेगळे उपक्रम राबविले जातात हे कार्य कौतुकास्पद आहे. अज्ञान व अंधश्रद्धा यात होरपळून गेलेल्या लोकांना बैठकीच्या माध्यमातून निरूपण देऊन लाखो कुटुंबांना सुखी व समाधानी करण्याचे काम डॉ.श्री.नानासाहेब धर्माधिकारी यांनी केले आहे व त्यांच्या पश्चात आता डॉ.श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी, श्री.सचिनदादा धर्माधिकारी करीत आहेत असे यावेळी स्वच्छता मोहीमेला उपस्थित असलेले रायगड जिल्हा कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती बबन मनवे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा