मुख्यमंत्री सहाय्यता निधी -कोविड-19 या नावाने स्वतंत्र बँक खाते

या खात्यात मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : कोविड  19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासन काटेकोर उपाययोजना करत असून या उपाययोजनांमध्ये अनेक स्वंयसेवी संस्था, उद्योजक, धार्मिक संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी होत आहेत, मुख्यमंत्री  सहाय्यता निधीस मदत करत आहेत, करू इच्छित आहेत. केवळ याच प्रयोजनार्थ मुख्यमंत्री  सहाय्यता  निधी- कोविड-19 हे स्वतंत्र बँक खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आले आहे. त्याचा बचत खाते क्रमांक 39239591720 आहे. 

सढळ हाताने मदत करा
उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व  संस्था आणि नागरिकांनी “मुख्यमंत्री सहाय्यता निधी- कोविड 19 या नावाने सुरु करण्यात आलेल्या खात्यात सढळ  हाताने मदतीची रक्कम जमा  करावी  असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा