म्हसळा - केलटेतील स्वयंभू महादेवाचे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान

म्हसळा - केलटेतील स्वयंभू महादेवाचे मंदिर भाविकांचे श्रध्दास्थान शेकडो भाविक पायी दिंडीत पोहचले देवाच्या द्वारी 

म्हसळा : महेश पवार म्हसळा तालुक्यातील काही अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेले आणि भाविकांचे श्रध्दास्थान श्री महादेवाच्या मंदिराची सर्वदूर ओळख आहे . यंदाही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवावर अभिषेकासाठी भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती . महाशिवरात्र निमित्त आज शुक्रवारी गावातून दिंडी टाळ मृदुंगाच्या गजरात भाविकांनी गावापासून मंदिरापर्यंत दिंडी काढली . आजच्या कार्यक्रमामध्ये विशेष म्हणजे मंदिराच्या संपूर्ण भोवताली परिसर ग्रामस्थांच्या श्रमदानातून आकर्षक सजविण्यात आला होता . उत्सवासाठी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोबनाक , किसन पवार , सचिव गणेश बोर्ले , उमेश पवार , गुरुनाथ जावळेकर आदिंसह ग्रामस्थ मेहनत घेत होते . ताम्रपटातील या मंदिराला सजविण्याचे काम केले होते . या मंदिराचे विशेष महत्व पाहता या ठिकाणी हजारो भाविक श्रद्धेने दर्शन घेण्यास येत असतात . या मंदिराच्या बाजूला भैरव देवी मंदिराचे स्थान आजही स्फूर्ती देणारे आहे . त्यामुळे आजही त्या ठिकाणी भक्त नतमस्तक या मंदिराला एक आकर्षक पर्यटकाचे स्थान निर्माण होण्यासारखे होतात. आहे . कारण घनदाट रानमाळ , नैसर्गिक पाण्याचे झरे , बारमाई वाहणाऱ्या नद्या , तर हरिहरेश्वर बागमांडला मुख्य रस्त्याच्या पासून केवळ ४०० मीटर अंतरावरती वसलेले हे स्थान आहे . तर दक्षिण काशी श्रीक्षेत्र हरेश्वर ठिकाणी जाताना या स्वयंभू शंकराचे दर्शन घेता येईल . त्यामुळे या स्थानाचा पर्यटनास्थळामध्ये समावेश करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

पर्यटनस्थळात समावेश व्हावा स्वयंभू महादेवाचे हे मंदिर १८ व्या शतकातील असल्याची नोंद ताम्रपटामध्ये आहे . घनदाट रानमाळ , नैसर्गिक पाण्याचे झरे , बारमाई वाहणाऱ्या नद्या तर हरिहरेश्वर बागमांडला मुख्य रस्त्यापासून केवळ ४०० मीटर अंतरावरती वसलेले असे हे स्थान आहे . या स्थानाचा पर्यटनस्थळांमध्ये समावेश करावा अशी मागणी गणेश बोर्ले , शांताराम कोबनाक यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे . 

शिवमंदिर हे जागृत देवस्थान आहे . आमच्या अनेक पिढ्या या शिवमंदिराचे पूजन करत असून अनेक कुटुंब सुखी झाली आहेत . हे स्वयंभू स्थान आहे . या स्थळाचा पर्यटन स्थळांमध्ये समावेश व्हावा.
-दामाजी पवार , वतनदार पाटील 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा