म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यात सावित्री नदीच्या तीरावर वसलेली रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तोराडी उर्दू या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सांस्कृतिक कार्यक्रम व वार्षिक बक्षिस वितरण सोहळा पार पडला. या सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांनी विविध कला सादर केल्या कोळी नृत्य, बालगीत, देशभक्तीपर गीत, नाटिका, शेतकरी गीत, सामाजिक जनजागृती वर देखावा, लावणी, नकला, चुटके, कवीता, कोकणातील पारंपारिक गीते सादर करून शाळेतील बाळ कलाकारांनी आपली सुंदर कला सादर करताना आपल्यातील कलागुण दाखवून दिले.
यावेळी प्रमुख पाहुणे साजिद इनामदार उद्योगजक , फैसल गीते एनसीपी युवा अध्यक्ष, अ.शकुर घनसार उद्योजक, डाॅ.मुबशीर जमादार शाहीन उर्दू , अ मज्जीद हजवाने अध्यक्ष जमात तोराडी, हर्षद पटेल मॅनेजर, गजानन साळुंखे केंद्र प्रमुख, किशोर मोहिते के.प्र. ,प्राध्यापक कानिफ भोसले, तांबे सर, डाॅ.गुडेकर,बोडके सर,गोराडे सर, लियाकत राऊत , सलाम कौचाली, आसिफ दफेदार,तारीक सर,मुसद्दी सर, तौफिक सर, रीयाज हजवाने, मुबशीर शेख (वकिल), जयसिंग बेटकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध खेळात, कलेत उल्लेखनीय कौशल्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री. ईक्बाल अ.गफूर कौचाली सर यांनी केले. शाळेचे व्यावस्थापन कमेटी अध्यक्ष अतहार महम्मद हजवाने, महम्मद अ. कदीर हजवाने. आणि सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केले.
Post a Comment