वसंतराव नाईक महाविद्यालयात कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन


● विद्यार्थ्यांना राष्ट्रहिताची जाणीव असावी - न्यायाधीश पी.बी.लंबे

म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर

     म्हसळा येथील कोकण उन्नती मित्र मंडळ संचलित वसंतराव नाईक कला, वाणिज्य व बँरिस्टर ए.आर.अंतुले विज्ञान महाविद्यालयात तालुका विधी समिती श्रीवर्धन, म्हसळा व वकिल संघटना श्रीवर्धन याच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक साक्षरता शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
सदर कार्यक्रमासाठी श्रीवर्धन कोर्टाचे न्यायाधीश पी.जी.लंबे, अँड.ए.ए.चौगुले, अँड.श्री.एम.व्ही.ठोसर अँड जे.डी.तांबुटकर, अँड.विठोबा पाटील अँड.मुकेश पाटील, वैभव पवार, प्रदिप डोलारे, श्री.पांडे  त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.व्ही.एस.एन.राघवराव, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थ्यांनी उपस्थित होते. न्यायाधीश श्री.पी.जी.लंबे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या याकार्यक्रमात प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. एन. राघवराव यांच्या हस्ते पी. जी. लंबे यांचे महाविद्यालयातर्फे शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सन्मानचिन्ह  देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रा.आर.एस.माशाले आणि अँड.विठोबा पाटील यांनी कार्यक्रम आयोजनाबाबतचे प्रस्ताविक सादर केले. त्यानंतर स्वदेश फाउंडेशन वैभव पंवार यांनी "पाणी जिरवा पाणी वाचवा" याविषयावर मार्गदर्शन करताना कोकणात वनराई बंधाऱ्याचे महत्त्व सांगितले तसेच आज आपल्या तालुक्यातील अनेक कुंटुबातील सदस्य उन्हाळ्यात गावात पाणी नाही म्हणून दुसऱ्या गावात स्थलांतर करतात आणि त्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे याची जाणीव विद्यार्थ्यांना करून दिली. पाण्याला पर्याय नसल्यामुळे आणि आपल्या भागात मोठी धरणे नसल्याने वनराई बंधाऱ्याच्या माध्यमातून कोकणात पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंब आणि थेंब अडवून जमिनीत जिरवणे गरजेचे आहे आणि त्यासाठी आवश्यक असणाऱी सर्व मदत स्वदेश फौडेशन करण्यासाठी तयार आहे. यानंतर अँड.ए.ए.चौगुले यांनी प्रदूषण मुक्त पाणी आणि हवा मिळविण्याचा अधिकार याविषयावर बोलताना त्यांनी प्रदूषणाची कारणे आणि प्रदूषण रोखण्याच्या उपाययोजना आणि प्रदूषण नियंत्रण कायदे याबाबत विद्यार्थ्यांना माहीती देऊन अन्नाची उपलब्धता आणि विषमता याबाबत मार्गदर्शन करताना भारतात आलेल्या विदेशी पाहुण्यांना आपण सोंन्याच्या ताटात जेवायला देतो पण त्याचवेळी आपल्या देशातीत भुकबळी विसरतो या वास्तव परीस्थितीची जाणीव विद्यार्थ्यांना करुन दिली. अँड.एम.व्ही.ठोसर यांनी पिडीताना नुकसान भरपाई योजना याबाबत मार्गदर्शन करताना एकतर्फी प्रेमातून होणारे अँसिड हल्ले, अत्याचार याविषयी माहिती देताना पिडीत महिलेला मिळणारी नुकसान भरपाई कोणकोणत्या मार्गाने मिळते याबाबतचे कायदे आणि याबाबत करणाऱ्या संस्था याविषयी माहिती देताना विद्यार्थ्यांना सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आणि आपल्या देशात अश्याप्रकारे पिडीत महिला होऊच नये असे वर्तन आपले असावे आपण प्रत्येक महिलेचा आदर करावा असे आव्हान विद्यार्थ्यांना केले. 
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीवर्धन कोर्टाचे न्यायाधीश श्री.पी.बी.लंबे यांनी मार्गदर्शन करताना केवळ स्वतः पुरते न पाहता समाजाचा विचार करावा आणि आपण करत असलेल्या कृतीतून राष्ट्रहित साध्य होत आहे कि नाही याची जाणीव ठेवून आपले वर्तन असावे त्यासाठी विद्यार्थी असताना आपणास कोणकोणत्या गोष्टी करता येऊ शकतात याबाबत विद्यार्थ्यांना माहीती दिली आणि ही माहिती आपल्या सर्वांना व्हावी यासाठीच मी आपल्या महाविद्यालयात या शिबीराचे आयोजन केले असे सांगितले. या कार्यक्रमासाठी शैक्षणिक वर्ष १९९८-९९ मध्ये बी.काँमचा अभ्यासक्रम पुर्ण करताना महाविद्यालयात प्रथम आलेला आणि बी.काँम नंतर बाबासाहेब आंबेडकर लाँ काँलेज मुंबई येथे एल.एल.बी.आणि मुंबई विद्यापीठातुन.एल.एल.एम चे शिक्षण पुर्ण करून श्रीवर्धन कोर्टात वकिल व्यवसाय करणारा विद्यार्थी अँड.विठोबा पाटील या माजी विद्यार्थ्यांचा महाविद्यालय तर्फे सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा.शिरीष समेळ आणि अँड तांबुटकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा