वाचन संस्कार व संस्कृतीवाढीसाठी सार्वजनिक वाचनालय म्हसळाचा स्तुत्य उपक्रम


(म्हसळा प्रतिनिधी)
मराठी भाषा दिन हा जगभरातील मराठी भाषकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. १९८७ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यानंतर शासनाने हा दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून जाहीर केला"याच
औचित्याने सार्वजनिक वाचनालय, येथे विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व मराठी भाषेबाबत प्रतिज्ञा घेण्यात आली.म्हसळा शाळा नं.१च्या विद्यार्थाना ५० पुस्तकांचा संच देऊन साखळी वाचनालयाचे सदस्य करून घेतले. यावेळी म्हसळा शाळा नं.१च्या सरस्वती सभागृहात झालेल्या सभेला तालुका गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, सचिव अशोक काते, मुख्याध्यापिका शुभदा दातार,जेष्ठ सदस्य अब्दुल र.मेमन, प्रा.मशाळे,खारगाव (खु)मुख्याध्यापक श्रीकांत सुतार, श्रीमती रेखा धारीया, साधन व्यक्ती दिपक पाटील, बोराडे, सलाम कौचाली,बेडके सर,राजेंद्र मालुसुरे, श्रीमती सुमित्रा खेडेकर, वंदना खोत, कल्पना पाटील, ता.कृ.अधिकारी डी.डी. अनाप, प्रमोद गायकवाड, व्ही.जी. सोनावणे,आर.एस. मांडवडे,ग्रंथपाल उदय करडे, सायली चोगले, धनश्री नाक्ती व अन्य उपस्थित होते. वसंतराव नाईक कॉलेजचे ग्रंथपाल .प्रा.मशाळे यानी वाचन संस्कार हे बालवयातील विद्यार्थ्यांवर चांगल्या तऱ्हेने बिंबता येतात याच वयात गोष्टी स्वरुपाची पुस्तक हाताळण्याची सवय लागते. लहान वयांत मुलाना वाचनालयात जाण्यास गैरसोयीचे होते त्याच वेळी म्हसळा सार्वजनीक वायनालयाने ग्रंथ बालवाचकांचे दारी हा राबवित आसलेला प्रकल्प अतीशय स्तुत्य आसल्याचे मशाळे यानी सांगितले. 
यावेळी माशाळे यानी प्रसिद्ध मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा गौरव दिनानिमित्तच्या मनोगतात मराठी भाषेचा व मराठी साहीत्याचा ऐतीहासीक आढावा घेत मुकुंदराजांच्या विवेक सिंधू पासून संत वांङमय, पंत वांङमय, शाहीरी वांङमय, आणि आलीकडच्या काळातील साहित्यीक दासू वैद्य, इंद्रजित भालेराव, यांच्या पर्यंतच्या संक्षिप्त इतिहासाचे विवरण स्पष्ट केले .पालकांकडून ऐकलेल्या कथनात्मक गोष्टी बालमनावर दिर्धकाळ संस्कारीत होतात म्हणून प्रत्येक मुलानी आपल्या आई -वडील, आजी- आजोबा यांच्याकडे रोज रात्री झोपण्या-पूर्वी गोष्टी सांगण्याचा आग्रह धरला पाहीजे तरच जाणत्या वयात मुले ग्रंथालयाकडे वळतील असे माशाळे यानी स्पष्ट केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा