म्हसळा : श्रीकांत बिरवाडकर
म्हसळा तालुक्यातील घुमेश्वर (घुम) गावात प्राचीन काळापासून ऐतिहासिक महत्व असलेल्या प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री स्वयंभु घुमेश्वर मंदिरात सालाबादप्रमाणे शुक्रवार दि.21 फेब्रुवारी 2020 रोजी महाशिवरात्र उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी गावातील लहान थोर, महिला, तरुण वर्ग सर्वांनी एकत्र येऊन मनोभावे पूजा अर्चा करून गावाची एकता जोपासली. सर्व गावकरी शिवनामत दंगले होते. तसेच घुमेश्वर गावाची एकता अबाधित राहावी आणि गावावर कोणतेही वाईट संकट येऊ नये अशी प्रार्थना सर्व घुमेश्वर वाशीयांनी केली.
महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणात पहाटे महादेवाच्या पिंडिवर अभिषेक, गावातून भव्य पालखी मिरवणूक, दिंडी, भजन, आरती, स्वागत समारंभ अशा विविध कार्यक्रमांनी महाशिवरात्री उत्सव साजरा साजरा केला. तालुका आणि तालुक्याच्या बाहेरील हजारो भाविक भक्तांनी स्वयंभू घुमेश्वर मंदिरात उपस्थित राहून श्री स्वयंभू घुमेश्वराचे दर्शन घेतले आणि आपले गाऱ्हाणे मांडले. घुमेश्वर ग्रामस्थ मंडळाचे वतीने सर्व भाविकांचे स्वागत करण्यात आले. महाशिवरात्री उत्सव आनंदात व सुरळीत पार पाडण्यासाठी घुमेश्वर ग्रामस्थ व महिला आणि मुंबई मंडळ, युवकांनी विशेष मेहनत घेतली.
Post a Comment