घंटागाडी नादा सोबत सफाई कामगारांंच्या आरोग्याची काळजी घ्या - उपनगराध्यक्षा सायलीताई खातू


तळा : किशोर पितळे
तळा नगरपंचायतीची स्वच्छता मोहीम२०२०राबविली जात असून घंटागाडीच्या "गाण्यात गाडी वाला है तो कचरा निकाल" स्वच्छ भारत का ईरादा कर दिया आपने,"आवाज करीत नागरिकांना कचरा गाडी आली आहे जागृत करते.या गाडीबरोबरअसणारे सफाई कामगार हे देखील माणसे असून त्यांच्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचेआहे त्याचा महिला वर्गाचा संबंध येतअसल्याने काळजी घ्यावी असे आवाहन उपनगराध्यक्षा तथा आरोग्य व स्वच्छता सभापती सायलीताई खातू यांनी केलेआहे.

रेड डॉट 🔴 रोज आपल्या सोसायटीमध्ये सफाई कामगार प्रत्येक घरातून, कॉलनीतून, सोसायटीतून  कचरा गोळा करतात.हा कचरा गोळा करुन झाल्यावर हे सफाई कामगार त्यातील सुका कचरा हा वेगवेगळा करतात. बऱ्याच वेळा अगदी पेपरमधे किंवा प्लास्टिक पिशवीतील कचरा काय आहे ते पाहण्यासाठी त्यांना ते उघडून पहावे लागते.या कचऱ्यामध्ये बरेचदा पेपरमधे घडी घालून ठेवलेले सॅनेटरी नॅपकीन आणि लहान मुलांच्या व आजारी माणसांच्या डायपरचाही समावेश असतो. जेव्हा सफाई कामगार हे घडी घातलेले पेपर उघडून पाहतात तेव्हा त्यांना देखील खूप किळसवाणे येते. बिचारे खूप अस्वस्थही होतात. त्यांना हे सर्व पाहून जेवणही जात नाही. पण काय करणार ?म्हणूनच यासाठी आपण  एक स्वच्छता अभियान राबवितआहोत.तुमच्याघरातीलकचऱ्यामध्ये जर असे सॅनेटरी नॅपकीन वा लहान मुलांचे व वृद्ध आजारी माणसांचे डायपर्स असतील तर पुढील गोष्टीकडे लक्ष द्या.असे हे सॅनेटरी नॅपकीन व डायपर्स एका पेपरमधे घालून त्याची व्यवस्थित घडी घाला व त्यावर एक रुपये आकाराचा रेड डॉट काढा .(उदाहरणार्थ 🔴)... यासाठी घरामध्ये एक रेड कलरचं स्केच पेन नेहमीसाठी असू द्या हे असे केल्याने सफाई कामगारांना समजेल की यामधे नॅपकीन किंवा डायपर्स आहेत..तेव्हा तेउघडून बघणारनाहीत...त्याचे विघटन करण्यात सोपे जाईल.सध्या सर्वत्र ही मोहीम राबवली जात आहे.आपल्या घरातल्या कचऱ्याचे व्यवस्थापन करणाऱ्या सफाई कामगारांच्या व त्यांच्या कुटुंबीयांच्याआरोग्याची काळजी घेणे ही तेवढेच महत्त्वाचे आहे...तरी आपण सर्वांनीही या मोहिमेमध्ये सहभागी होऊ या.असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा