काशीद समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी

प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
मुरुड : तालुक्यातील काशीद समुद्रकिनारी रविवारची सुट्टी साधून मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते . वाहनांच्या मोठ्या रांगा समुद्रकिनारी लागल्या होत्या . पर्यटक मोठ्या संख्येने आल्याने मुरुड पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता . पर्यटक उंटस्वारी , घोडागाडी तर काहींनी समुद्रात बनाना रायडिंग तर पॅरासेलिंगचा आनंद लुटला . पनवेल ठाणे , मुंबई व कल्याण येथील पर्यटक मोठ्या संख्येने आले होते . काशीद समुद्रकिनारा अक्षरशः पर्यटकांनी फुलून गेला होता . समुद्रकिनारी सुरूंच्या झाडाखाली बहुसंख्य पर्यटक आपल्या सोबत आणलेल्या भोजनाचा आनंद घेताना दिसत होते . काशिदच्या समुद्रकिनाऱ्यावरील सर्व स्टॉलवर मोठी गर्दी दिसत होती . विविध वस्तूंनी हे स्टॉल सजवण्यात आले होते . मोठ्या संख्येने मुरुडमध्ये दर शनिवार - रविवार पर्यटक येत असतात , यामुळे काशीद येथील स्थानिकांना मोठा रोजगार मिळाला असून त्यांचा आर्थिक स्तर सुद्धा उंचावला आहे . 

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा