तळा तालुका दिव्यांग मेळावा संपन्न


तळा : किशोरपितळे
रायगड जिल्ह्या दिव्यांगपुनर्वसन संस्था संलग्न तळा तालुका दिव्यांग संघटनेचा मेळावा शहरातील राधाकृष्ण मंदिरात पार पडला. यामेळाव्याला दिव्यांग पुनर्वसन संस्था राज्य अध्यक्ष मा.साईनाथ पवार,तळा तहसीलदार ए.एम.कनशेट्टी, गटविकास अधिकारी विजय यादव,नगरसेवक चंद्रकांत रोडे अध्यक्ष किशोर पितळे,पत्रकार कृष्णा भोसले,आमिष भौड यांसह दिव्यांग बंधू,भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांचे संघटनेच्या वतीने श्रीफळ शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कै.मनोहर जसवलकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी नगरसेवक चंद्रकांत रोडे यांनी दिव्यांग व्यक्ती हि दिव्यांग नसुन सुदृढ व्यक्ती दिंव्यांग आहे आज विविध क्षेत्रात करिअर करीत आहेत.मैदानी खेळ देखील खेळत असतात.शासनाने त्याच्यासाठी औषधोपचारासाठी ३%ते५%निधी नगरपंचायत ,ग्रामपंचायत मधून तरतुद केली जाते.त्यांना अंत्योदय रेशन, एस.टी तिकीट सवलत, संजय गांधी निराधार योजना मधून अर्थ सहाय्य( पेन्शन)चा लाभ दिला जात आहे. दिव्यांग व्यक्तीनी न्युनगंड काढूटाका.असेमार्गदर्शनकेले.मारुती शिर्के गुरुजी यांनी दिव्यांगानी संघटीत व्हा संघटनेतून असणारा लाभ मिळतो.ज्याच्या वंशा जावे तेेव्हा कळे यांची दुःखत्यानाच कळतात इतरांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. सुदृढ आहेत ते अपंग आहेत असे म्हटले तर वावगे ठरू नये.शरीराने कमकुवत असलात तरी खंबीरपणे पायावरउभे राहिले पाहिजे.
काहींंना जन्मजात दिंव्यांग येते तर अपघातीपणा मुळे येते जिध्द बाळगली पाहिजे.खचून जाऊ नका असे सांगितले मा.तहसीलदार कनशेट्टी म्हणाले की शासनाचे लाभ देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य  केले आहे  पेन्शन योजना, घरकुल योजना,प्राधान्यअंत्योदय रेशन, यांचा लाभ देतअसतो.विद्यार्थीशिष्यवृतीयोजना  काही उपेक्षित असतील ते देखील दिल्या जातील असे आश्वासन दिले.उपस्थितांना संबोधित करताना राज्य अध्यक्ष साईनाथ पवार यांनी सांगितले की आजच्या घडीला रायगड जिल्ह्यातील एकही दिव्यांग बांधव आपल्याला भीक मागताना दिसणार नाही या गोष्टीचा मलाअभिमान आहे.शासकीय योजनाचा लाभ घेताना  योग्य कागदपत्रांची पुर्तता करा.किकर्मचारी वर्गाकडून योजनेचा लाभ मिळेल आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र लढा तसेच दिव्यांग बांधवांनी नोकरीच्या शोधात न राहता व्यवसायाकडे वळावे असे आवाहन ही त्यांनी उपस्थित दिव्यांग बांधवांना केले.अध्यक्षीय भाषणात पितळे म्हणाले की एकमेका सहाय्य करू अवघे घरू सुपंथ या उक्तीप्रमाणे शासकीय अधिकारी कर्मचारी यांनी दिव्यांगाच्या असणाऱ्या योजना तळा गाळातील बांधवापर्यत पोहचवून सहकार्य करावे असे आवाहन केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा