संजय खांंबेटे : म्हसळा प्रतिनिधी
विविध प्रसंगी शाळा , कॉलेज, बँक, नगरपालीका, ग्रामपंचायत प्रशासकीय इमारती कार्यालयांवर राष्ट्रध्वज उभारतात . राष्ट्रध्वज लावण्याची योग्य पध्दत कोणती या विषयी संपूर्ण माहीती असणे आवश्यक असताना म्हसळा सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग यानी न्यू इंग्लीश स्कुल म्हसळा येथे तालुक्यातील केंद्र प्रमुख , प्राथमिक व माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक,शिक्षक, कर्मचारी यांचेसाठी ध्वजारोहणाचे "प्रात्यक्षिक व कार्यशाळेचे" आयोजन केले होते. यावेळी गट शिक्षण अधिकारी संतोष शेडगे, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष संजय खांबेटे, न्यू इंग्लीश स्कूलचे प्राचार्य के.एल. जाधव, गजानन साळुंखे, अनिल ठाकूर, कुमार खामकर, धोंडीराम सुर्यवंशी, बी.आर. आडे, किशोर मोहीते, सुनिल पवार, सलाम कौचाली, उमेश गोदाडे, दिपक पाटील, प्रकाश कोठावळे, ग्रंथपाल उदय करडे, श्रीमती सायली चोगले, धनश्री नाक्ती , दिपक चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रशिक्षक राजेंद्र मालुसुरे सर यानी उपस्थिताना ध्वजाचे प्रमाणित आकार, लावण्याची पध्दत, शाळांमधून ध्वजारोहण, ध्वजवंदन, ध्वजासमोरील ध्वज निष्ठेची प्रतिज्ञा, ध्वजाची घडी घालण्याची सोपी पध्दत व गाठ मारण्याचे कौशल्य या बाबत सविस्तर माहीती दिली व उपस्थितानी विचारलेल्या शंका कुशंकाना मुद्देसूद उत्तरे दिली.
I
राष्ट्रीय कार्यक्रम, सांस्कृतिक व मैदानी खेळाच्या वेळी नागरिक कागदाचा झेंडा हातात घेऊन फडकवताना दिसतात. मात्र, कार्यक्रम झाल्यानंतर तेच झेंडे जमिनीवर इतरत्र फेकलेले दिसतात. ते टाळले पाहिजे. प्लॅस्टिकपासून तयार करण्यात आलेल्या झेंड्यांचा उपयोग करू नये.ध्वज संहितांनुसार जेव्हा राष्ट्रीय ध्वज फडकविला जातो तेव्हा त्याला सन्मानपूर्वक उच्च स्थान दिले पाहिजे.
-श्री. संतोष शेडगे, गट शिक्षण अधिकारी, म्हसळा.
Post a Comment