मुंबई (गुरुदत्त वाकदेकर)
प्रत्येक रसिक प्रेक्षकांने नक्की पाहिले पाहिजे असे एक आगळेवेगळे, मनोरंजनात्मक, कथनशील, सूरताल मय, तीन अंकी काव्यनाट्य सुरु होत आहे. ज्यात कथाकार, कवी, कवयित्री, गायक, नर्तक आणि अभिनय व सादरीकरण करणारे सर्व कलाकार असतील डॉक्टर. वैद्यकीय व्यवसाय करणारे आणि सोबत आपले छंद जोपासणारे डॉक्टर ! याचा शुभारंभाचा प्रयोग रविवार, दिनांक १२ जानेवारी, २०२० रोजी संध्याकाळी ६ ते ९ या वेळेत ग्यानसागर अॅम्फी थिएटर, देवीदास रोड, ब्रम्हकुमारी गार्डन, क्लब अॅक्वेरियाच्या समोर, बोरीवली प, मुंबई-९२ येथे होणार आहे. जालना, औरंगाबाद, कोल्हापूर, नाशिक, बारामती, देवगड, सिंधुदुर्ग, खिद्रापूर, वसई, चिंचवड, पुणे, मुंबई अशाप्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून, आलेल्या डॉक्टरांच्या कलाकृतीने सजलेला असा हा नाट्याविष्कार पाहणं ही दर्दी प्रेक्षकांसाठी पर्वणीच असेल. अशी माहिती संकल्पक व संयोजक डॉ. प्रज्वल म्हस्के यांनी दिली. ह्या काव्यनाट्याच्या वेगळ्याच प्रयोगाला अनुरूप अशा डॉकटरांच्या कविता निवडीचं महत्वाचं काम गुरुदत्त वाकदेकर आणि नितीन शिंदे यांनी लिलया पार पाडले. ह्या नाटकाचे जास्तीत जास्त प्रयोग व्हावेत, तसेच त्यासोबत रसिकांना काही स्वास्थ्य तपासणी, परिक्षण व औषधे सवलतीच्या दरात देण्याचा मनोदय डॉ. प्रज्वल म्हस्के यांनी व्यक्त केला. अधिक माहितीसाठी व सवलतींसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा. 9869500446 (फक्त व्हाॅट्सअप संदेश) kavitanchadawakhana@gmail.com बुकिंग https://www.ticketees.com या संकेतस्थळावर सूरू आहे.
Post a Comment