संजय खांबेेेटे म्हसळा प्रतिनिधी
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९या योजनेने राज्य शासनाने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला. त्याच अनुषंगाने आज जिल्ह्यात शेतकरी कर्ज माफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे . त्याच अनुषंगाने जिल्ह्या तीत १५ तालुक्यात मा. जिल्हाधिकारी साहेब यानी शीघ्रगतीने पात्र पिक कर्जदार शेतकऱ्यांचे आधार सलग्न (Adhar Linking ) कार्यक्रम हाती घेतला आहे. म्हसळा तालुका या कार्यक्रमात पूर्तता करून तालुक्यात १०० % पात्र पिक कर्जदार शेतकऱ्याना१०० % लाभ होईल असे लक्ष ठेऊन काम करू असे रायगड जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यानी तालुक्यातील बॅंक अधिकारी, सहकारी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्या म्हसळा तहसील कार्यालयांत तालुका स्तरीय प्रशिक्षण कार्यक्रमात अवाहन केले. यावेळी तहसीलदार शरद गोसावी , ग. वि. अ. वाय.एन. प्रभे,ता. कृ.अ.ज्ञानेश्वर अनाप, नायव तहसीलदार के.टी. भिंगारे व अन्य उपस्थित होते.
सरकारच्यावतीने शेतकऱ्यांचं सप्टेंबर २०१९ पर्यंतचं दोन लाख रुपयांचं कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केली. ही योजना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना नावाने अंमलात येणार आहे. येत्या मार्च २०२० पासून ही शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येणार आहे.
पुढील शेतकरी असणार पात्र
राज्यातील छोटे- मोठे सर्व शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र आहेत.ज्या शेतकऱ्यांनी ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत कर्ज घेतलं आहे, ते सर्व शेतकरी पात्र.ज्या शेतकऱ्यांनी पीककर्ज म्हणून कर्ज घेतलं आहे, त्यांचही कर्ज माफ होईल.ज्या शेतकऱ्यांचं कर्ज दोन लाखापेक्षा जास्त असेल, त्यांचं दोन लाखापर्यंतचं कर्ज माफ होईल.शेतकऱ्यांना कोणत्याही अटीशिवाय कर्जमाफी मिळेल.कर्जमाफीसाठी कोणालाही फॉर्म भरायची गरज पडणार नाही.शेतकऱ्यांच्या खात्यावर आधार लिंक असलेल्या खात्यात थेट कर्जमाफी मिळणार आहे.
"म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा मध्यवर्ती सह.बँक ( म्हसळा) २६४, स्टेट बँक ऑफ इंडिया , आंबेत , २८, बॅंक ऑफ इंडिया म्हसळा शाखा २१६,बॅंक ऑफ इंडिया मेंदडी शाखा १५४ असे एकूण ६५२ पात्र पिक कर्जदार शेतकरी आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हसळा व बॅंक ऑफ इंडिया खामगाव शाखेची माहीती अद्याप आलेली नाही"
-शरद गोसावी , तहसीलदार म्हसळा.
" या योजनेसाठी मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी सोडून सर्वांना कर्जमाफी मिळणार. कर्जमाफीसाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य पात्र असणार."
Post a Comment