गोखले महाविद्यालयात राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन

श्रीवर्धन : वार्ताहर
 गुणवत्ता सुधारण्यासाठी महाविद्यालय नेहमी प्रयत्नशील राहील असे प्रतिपादन श्रीवर्धन मधील गोखले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . एस . व्ही . जोशी यांनी केले आहे . श्रीवर्धन येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या इंटर्नल क्वालिटी अँन्शुरन्स सेलच्या माध्यमातून क्वालिटी अँन्शुरन्स स्ट्रॅटेजी या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . कार्यशाळेच्या पहिल्या सत्रात डॉ . एन . एम . धर्माधिकारी ( नॅक पिअर टीम मेंबरव यू . . सी . कमिटी मेंबर ) यांनी गुणवत्तेची खात्री निर्माण करण्यासाठी कोणती धोरणे आखावीत व गुणवत्ता वाढीसाठी कसे प्रयत्न करावेत याबद्दल सखोल मार्गदर्शन केले . या कार्यशाळेस विविध महाविद्यालयांचे प्राचार्य , आय . क्यू . ए . सी . समन्वयक सभासद व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते . याशिवाय प्रा . एस . आर . कुलकर्णी ( सपट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग , नाशिक ) व प्राचार्य आनंद जोशी यांची उपस्थितीही महत्वाची ठरली . कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनाकरिता उप प्राचार्य प्रा . एस . आर . भोसले , प्राध्यापक वर्ग व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले . प्रा . निलेश चव्हाण व प्रा . पंकज गमे यांनी सूत्रसंचालन केले . प्रा . राजू गोरूले यांनी आभार मानले .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा