सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ मांदाड आयोजित स्वच्छता अभियान यशस्वी संपन्न..

राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करून केली स्वच्छता अभियानाला सुरवात..

मांदाड - (केशव पिठे) सार्वजनिक नवरात्र उत्सव मित्र मंडळ मांदाड आयोजित रविवार दि १२ जानेवारी २०२० रोजी स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून मानवंदना देण्यात आली. ग्रामस्थ यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अवघ्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या, धैर्य-शौर्य-न्याय-परोपकाराची शिकवण देणाऱ्या आदर्श माता, राजनीती तसेच युद्धकलेत निपुण असणाऱ्या वीरमाता, जिजाऊ यांच्या वर उपस्थित युवकांनी दिशा देणारी माहिती व ध्येय मंत्र आणि प्रेरणा मंत्र म्हणत आपल्या मनोगता मधून संबोधित केली. नंतर गावातील मुख्य ठीकाणी साफ स्वच्छता करण्यात आली. सुका कचरा, ओला कचरा आणि गल्लीबोलात असणाऱ्या गटारात उतरून कचऱ्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली. १० ते १५ युवकांच्या तुकड्या करून अतिशय शिस्तबद्ध पध्दतीने मोहीम यशस्वी करण्यात आली. सुरक्षेची काळजी घेत सर्व युवकांनी स्वच्छते विषयी जनजागृती गावात निर्माण केली. या अभियानात जवळपास ६० ते ७० च्या आसपास युवकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या अभियानात शाळकरी विद्यार्थी आणि शिक्षक सहभागी झाले होते. सदर शिबिराचे गावातील सर्वच जण कौतूक करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा