म्हसळयातील14 जणांना कोकणरत्न पुरस्काराने करण्यात आले सन्मानित ; महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी आयोजित "क्रियाशील शिक्षक कोकणरत्न" पुरस्काराने केले सन्मानित
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पुरोगामी शिक्षक आघाडी आयोजित क्रियाशील शिक्षक कोकणरत्न पुरस्कार सोहळा 2019 - 20 चे मा श्री. बाळाराम पाटील आमदार, कोकण शिक्षक आमदार संघ यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि 12 जानेवारी 2020 रोजी विरुपाक्ष मंगलकार्यालय पनवेल येथे मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मा श्रीमती योगिता पारधी अध्यक्ष रायगड जिल्हा परीषद, मा श्री जे.एम.म्हात्रे माजी नगराध्यक्ष, श्री शंकरराव म्हसकर, पनवेल पं.स माजी सभापती श्रीमती प्रणाली भोईर , श्री नारायण घरत,श्री शरद लाड माजी नगराध्यक्ष कर्जत, श्री हरेश केणी नगरसेवक, पुरोगामी शिक्षक संघटना रायगड शाखेचे अध्यक्ष श्री कुरकमाने, सचिव श्री वैभव म्हात्रे, माध्यमिक शिक्षणाधिकारी मा. श्री थोरात साहेब..हे उपस्थित होते. मा श्री बाळाराम पाटील साहेब यांनी आपल्या मनोगतात कोकण विभागातील सर्व जिल्ह्यात पुरस्कार कार्यक्रम 31 मार्च अखेरपर्यंत पूर्ण केला जाईल.व यापुढे दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करणार आहोत. गुणवत्ता विकास, शिष्यवृत्ती परीक्षा यासाठी नवनवीन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत .
जाहिरात...
सदर कार्यक्रमात जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व श्रीफळ देवून गौरविण्यात आले. यामध्ये म्हसळा गटातील श्री.प्रा. मच्छिंद्र शंकरराव जाधव ,वसंतराव नाईक महाविद्यालय, श्री पी.व्ही.बोराटे, न्यू इंग्लिश स्कूल व ज्यु काँँलेज श्री बांगी कमरोद्दिन नजीर अहमद AIJ ज्यु. काँलेज समीर अत्तार बादशहा न्यू इंग्लिश स्कूल नेवरुळ, वसंत विठ्ठल सातपुते न्यू इंग्लिश स्कूल खरसई, श्री प्रफुल्ल रामचंद्र पाटील पी.एन.पी.पाप्टी,चाळके किरण गोविंद को ए सो ,पी एन पी काळसुरी, येरुणकर अजित दगडू घ.ल.घोसाळकर खामगाव, संतोष धोंडलिंग जंगम व श्री मंगेश अशोक कदम न्यू इंग्लिश स्कूल, श्री हवा एजाज अहमद मौलाना अबुल कलाम आझाद पांगळोली, श्रीमती शेख रिझवाना परविन जावेद इक्बाल AIJ गोंडघर, श्रीमती खलिफा फातिमा वसिम आयडीयल , श्री. आयुब बीजापुरे AIJ अशा 14 जणांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
म्हसळा तालुक्यातुन पुरस्कार मिळाले बद्दल पंचायत समिती सभापती मा श्रीमती उज्वलाताई सावंत, उपसभापती मा श्री मधुकर गायकर, जि प सदस्य मा श्री बबनशेठ मनवे, मा श्रीमती धनश्री पाटील, माजी सभापती सौ छायाताई म्हात्रे, माजी उपसभापती श्री संदीपजी चाचले, पांगलोली हायस्कूल व ज्यु.काँलेजचे चेअरमन श्री अलिशेठ कौचाली, जिल्हा अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष मा श्री नाजीमभाई हसवारे, न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक कमिटी अध्यक्ष श्री समीरजी बनकर, शेतकरी कामगार पक्ष तालुका चिटणीस तथा रा.जि.म.सह बँंकेचै संचालक श्री संतोष पाटील, श्री तुकाराम महाडिक संचालक RDCC, मा श्री परशुराम मांदाडकर स्कूल कमिटी अध्यक्ष खरसई, श्रीपत धोकटे सरपंच कणघर, निलेश मांदाडकर अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना तथा सरपंच खरसई, श्री चंद्रकांत बेडेकर अध्यक्ष काळसुरी हाय.श्री राजाराम धुमाळ अध्यक्ष पाष्टी हाय.यांनी शुभेच्छा दिल्या.
Post a Comment