उपक्रमशील तरुण प्रकाश रायकर यांची म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष पदी निवड

फोटो : निवडणूक निर्णय अधिकारी मनोज भागवत रायकर यांचा सत्कार करताना


उपक्रमशील तरुण प्रकाश रायकर यांची म्हसळा तालुका भाजप अध्यक्ष म्हणून निवड ; बहुजन समाजाला मिळालेले नेतृत्व म्हणून तालुक्याचे लक्ष

संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
म्हसळा तालुका भाजपाची आज अंर्तगत निवडणूक प्रक्रीया पूर्ण झाली.पुढील तीन वर्षासाठी तालुका अध्यक्ष म्हणून प्रकाश गोपाळ रायकर या ग्रामीण भागातील युवकाची निवड झाल्याचे भाजपाचे निवडणूक निर्णय अधिकारी मनोज भागवत यानी जाहीर केले. यावेळी महेश पाटील, तुकाराम पाटील, मिना टिंगरे, प्रकाश कोठावळे, समीर धनसे, प्रियंका शिंदे, मंगेश मुंडे,जब्बरसिंह राजपूत, लहू तुरे, भालचंद्र करड़े, अनिल टिंगरे, सुनिल शिंदे, गणेश बोर्ले, रमेश सावंत, शरद चव्हाण, मनोहर जाधव, जयवंत आवेरे, दिलीप कोबनाक, शरद कांबले व अन्य तालुका पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.शिवाजी नगर (चाफेवाडी) येथील अतिशय हुशार, राजकीय अनुभव असलेले रायकर यानी २०१४ साली राज्यात शिवसेना -भाजप युती तुटल्यावर श्रीवर्धन चे भाजपा नेतृत्व कोबनाक यांच्यासमवेत भाजपात सक्रीय झाले व कोबनाक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत त्यानी भाजपाची कास धरली गाववाडी तालुक्यातील गोर- गरीब समाजाला सोबत घेऊन काम करणाऱ्या व विकास साधणाऱ्या एक निष्ठावंत कार्यकर्ता भाजप पक्षाचा तालुका अध्यक्ष होण्याचा मान कार्यकर्त्यांला मिळाला यातच आमचे समाधान असल्याचे यावेळी अन्य कार्यकर्तानी मनोगत व्यक्त करताना सांगितले.पूर्वी ग्रामीण भागात तोळामासा असलेली भाजपाची ताकद दिवसेंदिवस वाढू लागली आहे. येत्या काही काळात म्हसळा नगरपंचायत, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीवेळी प्रकाश रायकर यांची बहुजन समाजातील ताकद विशेष कामी येणार आहे.

जाहिरात

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा