प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
२९ डिसेंबर २०१९ रोजी ठिकाण- अनंता अलिम मैदान येथे मुलींच्या क्रिकेट स्पर्धा अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडल्या. यामध्ये विभागातील भापट, ठाकरोळी, देवघर, चिरगाव, रुद्रवट, पाणदरे, चिराठी, ढोरजे, सांगवड, ताम्हणे करंबे इ. संघानी सहभाग नोंदवला.
सध्याच्या युगात मुली कुठेही मागे नाहीत. त्यासुद्धा मुलांच्या बरोबरीने खेळ खेळून आनंद घेऊ शकतात, हे कौशल्य भापट अनंता अलिम मैदानावर दिसून आले. ॐ शिव सत्य क्रिकेट संघ भापटचे खजिनदार श्री. अमोल अलिम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्रथम पारितोषिक रोख रु. २,०००/- कुमारी. मनस्वी महेश घडशी हिच्यातर्फे, द्वितीय पारितोषिक रोख रु. १,०००/- कु. अन्वित अमोल अलिम याच्यातर्फे, तृतीय पारितोषिक रोख रु. ५००/- स्वर्गीय. सरस्वती लक्ष्मण कलबटे यांच्यातर्फे होते. तसेच प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक चषक समाजसेवक श्री. महेंद्र सखाराम जाधव यांच्यातर्फे, उत्कृष्ट फलंदाज व गोलंदाज चषक कुमारी. तन्वी रामचंद्र कुवारे हिच्यातर्फे, विजेता व उपविजेता संघास मेडल गणेश मुकनाक यांच्यातर्फे, चाॅकलेट पुरवठा श्री. सतिश घडशी यांच्यातर्फे इ. प्रायोजकांच्या सहकार्यातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक - यजमान संघ भापट, द्वितीय क्रमांक - पाणदरे, तृतीय क्रमांक - ताम्हणे करंबे यांनी पटकावला. उत्कृष्ट फलंदाज कुमारी. प्रगती अलिम, उत्कृष्ट गोलंदाज कुमारी. आशिका पोस्टुरे, स्नेहा मौले यांना देण्यात आले. या स्पर्धेसाठी स्थानिक ग्रामस्थ मंडळ व महिला मंडळ यांनी मोलाचे सहकार्य केले. या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचे सुत्रसंचालन श्री. अमोल अलिम यांनी केले व आभार प्रदर्शन श्री. रामचंद्र कुवारे यांनी केले.
Post a Comment