श्रीवर्धन शहर रंगोळ्यासह रोषणाई ने सजले : आई सोमजाई रथ उत्सव मोठ्या उत्साहात साजरा


श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

श्रीवर्धन ची ग्रामदेवता सोमजाई  मातेचा सप्ताह शनिवारी दुपारी 12 :30 ला संपन्न झाला .शुक्रवारी रात्री 12 वाजता रथ उत्सवाला सुरुवात झाली .सोमजाई ही श्रीवर्धन शहराची ग्रामदेवता असल्याने संपुर्ण श्रीवर्धन शहराला रोषणाई करण्यात आली होती .मेंटकर्णी ते  सोमजाई मंदिर पर्यंत भव्य रोषणाई करण्यात आली .नवी पेठ , कसबा ,वाणी आळी , गणेश आळी ,रोहिदास नगर   सर्व भागात नागरिकांनी सुंदर रांगोळी काढत ग्रामदेवतेचे स्वागत केले .सदर च्या सप्ताह साठी संपूर्ण तालुक्यातील जनतेनं हजेरी लावली होती .दिघी ते बागमांडला पर्यंत च्या सर्व भाविकांनी देवीचे दर्शन घेतले .माता सोमजाई ही नवसाला पावणारी देवी मानली जाते .देवीचे मंदिर पेशवेकालीन आहे .अंदाजे 22 गुंठे परिसर मंदिराला लाभला आहे .रथ उत्सवाला  रात्री 12 वाजता सुरुवात झाल्या नंतर श्रीवर्धनकरांनी प्रत्येक आळी व पाखडीत रथाचे जल्लोषात स्वागत केले आहे .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा