श्रीवर्धन येथे महाराष्ट्र पोलिस बाईज संघटनेच्या वतीने 26/11 मुंबई हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली व सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न
==========================
प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
जनतेच्या सुरक्षेसाठी आपले कुटुंब सोडून 24 तास सदैव सेवा देण्याचे मोठे कार्य आपले पोलीस बांधव करत आहेत. अनेकदा देशाच्या शत्रूशी लढतांना आपले जवान शहीद झाले आहेत, मुंबई येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात जे आपले पोलीस अधिकारी, कर्मचारी शहिद झाले त्यांना महाराष्ट्र पोलीस बाँईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाने सचिव श्री. मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांच्या नियोजनात श्रद्धांजली व सर्व पोलीस कर्मचारी यांचा श्रीवर्धन पोलीस ठाण्यात सत्कार संपन्न झाला. यावेळी सर्व शहिदांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. पोलिस बाँईज संघटनेचे सचिव श्री. मिठ्ठू त्रिंबक आंधळे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की, पोलिसांप्रति आदर राखावा, पोलीस हे सणासुदीमध्ये आपण सुखी राहावे म्हणून रक्षक बनून २४ तास काम करतात, ते सदैव कामगिरी करतात म्हणून आपण सुखाने निवांत राहु शकतोत. यावेळी कास्ट्राईब परिवहन संघटनेचे राहुल गायकवाड यांनी सांगितले की, आपण आपल्या समाजाचे देणे लागतोय म्हणून आपण यांच्या प्रती सदैव आदर मनात आदर ठेवला पाहिजे.यावेळी सर्व पोलिस बांधवाला गुलाब पुष्प देऊन त्यांचे अभिनंदन करुन पोलिसांप्रती सद्भावना व्यक्त करण्यात आल्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्रीवर्धन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. जीवन पाटील हे होते. यावेळी पत्रकार संतोष सापते, सहा फौ जयप्रकाश म्हात्रे पोहवा राजेंद्र सरोदे पोना संतोष गुरव पोना अतुल जाधव पोशि गणेश आठरे पोशि देविदास कारखेले पोशि विकास कांबळे पोशि विलास मोरे मपोना मीनल कांबळे मपोशी वर्षा साबळे तर एस.टी. कर्मचारी हनुमान सारूक, कालिदास गर्जे, विनय घुले, किशोर अकोलकर, संतोष सापते, उद्धव पालवे,अनिल मोरे, पवार, जाधव यांनी परिश्रम घेतले पोलीस पोलीस बाँईज संघटनेचे सचिव श्री. मिठ्ठू त्रिंबक आंधळे सर्वांचे आभार मानले.
Post a Comment