माहे एप्रिल, मे व नोव्हेंबर 2016 तसेच माहे जून ते ऑक्टोबर, 2016, माहे एप्रिल ते ऑक्टोबर 2017 आणि एप्रिल 2018 या कालावधीत अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीसाठी मदत वाटपाचे अनुदान शासनाकडून संबंधित तहसीलदार कार्यालयास सन 2018-19 मध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु बहुतांश शेतकऱ्यांचे बँक खाते क्रमांक उपलब्ध होत नाहीत. काही शेतकऱ्यांचे संयुक्त खाते असल्याने संबंधित खातेदारांनी अद्यापही संमतीपत्र/हमीपत्र अद्यापही उपलब्ध केली नाही. त्यामुळे शेती नुकसानभरपाई अनुदान वाटप करण्यास स्थानिक प्रशासनास अडचणी येत असल्याचे दिसून येत आहे.त्याचा परिणाम शेलकऱ्याना अद्यापही आर्थिक मदत मिळू शकलेली नाही.उक्त कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकांचे नुकसान झाले आहे, त्या शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते क्रमांक व संयुक्त खातेदारांनी बँक खाते क्रमांक व संमती/हमीपत्र संबंधित तहसीलदार कार्यालयात दिनांक 7 नोव्हेंबर 2019 रोजी पर्यंत सादर करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रायगड यांनी केले आहे.
शेतकऱ्यानी बँक खाते क्रमांक व संयुक्त खातेदारांनी खाते क्रमांक व संमती/हमीपत्र सादर करावे : नुकसान भरपाई मिळणार
Admin Team
0
Post a Comment