दिघी प्रतिनिधी
श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन मध्ये त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त येथील ग्रामदेवता श्री चिंचबादेवी मंदिरामध्ये 1111 दिव्यांची रोषणाई करण्यात आली असून सामाजिक रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
श्री चिंचबादेवी मंदिर हे बोर्लीपंचतन पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे श्रध्दास्थान असून दरवर्षी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने येथील सर्व जातीय समाज बांधव या कार्यक्रमाचा आस्वाद घेत असतात. यावेळी मंदिरामध्ये सामाजिक रांगोळी स्पर्धा विषयातून नवीन दृष्टी देणारं उपक्रम राबविण्यात आला.
श्री चिंचबादेवी देवस्थांनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. दिव्यांच्या रोषणाई सोबतच रांगोळी स्पर्धचे आयोजन देखील करण्यात आले होते. या स्पर्धेला श्रीवर्धन परिसरातील अनेक स्पर्धकांनी आपला सहभाग दर्शविला व विविध विषयावर हुबेहूब रांगोळी रेखाटून गावकऱ्यांची मने जिंकली. स्त्रीभ्रूणहत्या, मोबाईल चा गैरवापर, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास असे अनेक विषय स्पर्धकांना देण्यात आले होते. सदर स्पर्धेमंध्ये प्रथम पारितोषिकाचा मानकरी मदन कावळे दिघी तर द्वितीय पारितोषिक रोहित पाटील दिघी व तृतीय परितोषिकवर जयवंत पाटील कुडगाव यांनी आपले नाव कोरले. सर्व स्पर्धकांचे श्री चिंचबादेवी ट्रस्ट चे अध्यक्ष गणेश पाटील या यांनी अभिनंदन केले.
संपूर्ण रांगोळ्या पाहण्यासाठी भेट द्या...👇
Post a Comment