शहरातील सार्वजनिक शौचालायसाठी वेळेची निश्चिती:रात्रीच्या वेळेस प्रसाधंनासाठी महिला प्रवाश्यांची होते पळापळ

फोटो-म्हसळा शहरामध्ये बस स्थानक नजीक असणारा सार्वजनिक शौचालय रात्रीच्या वेळेस कुलूपबंद असल्याचे दिसत आहे. 
 
म्हसळा(निकेश कोकचा)
 
म्हसळा शहरातील बसस्थानका शेजारी असणार्‍या एकमात्र सार्वजनिक शौचालायसाठी वेळेचे बंधन असल्याने रात्रीच्या वेळेस प्रवास करणार्‍या प्रवाश्यांसहित महिलांची पळापळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
लोकनेते रामशेट ठाकुर हे खासदार असताना त्यांच्या खासदार निधीतून प्रवाश्यांच्या प्रसाधंनाच्या सोईसाठी म्हसळा शहरातील बसस्थानका नजीक सार्वजनिक शौचालायचे बांधकाम करण्यात आले होते.जेणेकरून मुंबई येथून म्हसळा मार्गे श्रीवर्धन व बोर्ली सुटणार्‍या रात्रीच्या वेळेस बारे ते सोळा गाड्यातील प्रवाश्यांना याचा उपयोग करता यावा.मात्र मागील काही वर्षापासून हे शौचालय रात्री 8 वाजल्याच्या दरम्यान बंद करण्यात येते असून सकाळी 8 वाजता उघडण्यात येत असल्याने महिलासहीत इतर प्रवाश्यांचे प्रसाधंनासाठी हाल होत आहे.स्वछ भारत अभियान अंतर्गत शासन सर्वांना शौचालय बांधून देत असली तरी म्हसळा नगरपंचायतीने मात्र प्रवाश्यांच्या सोयीसाठी बांधण्यात आलेल्या एकमात्र सार्वजनिक शौचालायसाठी वेळेचे बंधन देऊन या योजनेचा फज्जा केला असून प्रवाश्यांना उघड्यावर शौच करण्यासाठी प्रोत्साहित केले आहे.संबंधित सार्वजनिक शौचालय रात्रीच्या वेळेस देखील प्रसाधंनासाठी खुला करण्यात यावा अशी मागणी शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना पानसारे यांनी केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा