म्हसळा : प्रतिनिधी
दि. ०७ आॅक्टोबर २०१९ रोजी रोहा वनविभागातील म्हसळा वनक्षेत्रांतर्गत सरवर बीटातील वनव्यवस्थापन समिती भापट व रा.जि.प. प्राथमिक शाळा भापट यांच्या संयुक्त विद्यमानाने भापट येथे 'वन्यजीव सप्ताह २०१९' म्हसला वनक्षेत्रपाल एन.डी.पाटिल आणि एस.पी.थले भाऊसाहेब म्हसला,सरवर बिट याच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी स्थानिक गाव अध्यक्ष श्री. प्रविण ठोंबरे होते. सरवर बीटाचे वनरक्षक हरीराम बनसोडे, म्हसळा व देहेन बीटाचे वनरक्षक अंगदेजी भोसले, दुधाने, भीमराव सुर्यतळ, शिक्षक जयसिंग बेटकर, अजय केंद्रे सर, प्रविण ठोंबरे, पांडुरंग जाडे, धोंडु भोसले, महादेव मोहिते, ज्येष्ठ महिला सिताबाई कांदेकर, सुनंदा मोहिते, शोभा मोहिते, महिला उपाध्यक्षा रंजिता कुवारे, अंगणवाडी सेविका अनुजा अलिम, भागिर्थी जोशी, शुभांगी पारदले, विजया जोशी, अनिता भोसले, पार्वती बेटकर, इ. आदी मान्यवर व महिला मंडळ यावेळी उपस्थित होते.यावेली उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. आणि शाहीर भिमराव सुर्यतल यांनी मधूर वाणीने स्वागत गीत व सप्तावर आधारीत गीत सादर करून उपस्थित लोकांची मने जिंकली.
१ ते ७ आॅक्टोबर या कालावधित वन्यजीव सप्ताहाचे आयोजन केले जाते तरी भापट शाळेत निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक अनुष्का गणेश मोहिते, द्वितीय क्रमांक तन्वी रामचंद्र कुवारे, तृतीय क्रमांक पार्थ रमेश अलिम तसेच निबंध स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कोमल राजेश कांदेकर, द्वितीय क्रमांक आरुषी सुनील भोसले, तृतीय क्रमांक मानव मनेश सोलकर यांनी पटकावला. या सर्व विजेत्यांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच सहभागी विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी भेटवस्तू देऊन प्रोत्साहित करण्यात आले.
यावेळी वनरक्षक अंगदेजी भोसले यांनी मनोगतात सांगितले की, वन्यजीव सप्ताह कार्यक्रम राबवून विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ, शेतकरी यांच्यामध्ये जनजागृती करणे, ही काळाची गरज आहे. वनांचे संरक्षण करणे, वन्यप्राण्यांना आधार देणे, आवश्यक आहे. आजच्या काळात जंगलातील पशूपक्षी नामशेष होत चालले आहेत. हे कुठेतरी थांबवायचे असेल तर वन्यजीव सप्ताह कार्यक्रमाच्या माध्यमातून जनजागृती करुन ते लोकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणे ही काळाची गरज बनली आहे, अशाप्रकारचे मार्गदर्शन वनरक्षक भोसले यांनी केले.
वनरक्षक हरीराम बनसोडे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला विविध पशुपक्षी दिसायचे.व इतर प्राणी यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. त्यामुळे ही कमी होत चाललेली संख्या वाढवायची आहे. तरच या निसर्गात समतोल साधला जाईल. दरवर्षी आपण वृक्षारोपण करतो. पण ती झाडे आपण जगवली पाहिजेत. त्यांचे संरक्षण केले पाहिजे. तरच पाऊस जास्त प्रमाणात पडेल व जमिनीची धूप थांबेल. म्हणुन आजचे जीवनमान चांगल्याप्रकारे टिकवण्यासाठी, निसर्गाचा समतोल साधण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार महत्त्वाचा आहे.तसेच भापट ग्रामस्थ व महिला मंडल यांचा लोकसहभाग लागतो तेव्हा १००% मिलत असतो. भापट शालेतील विद्यार्थांनी सुंदर चित्र व निबंध स्पर्धेत सहभाग घेऊन वन्यजीव सप्ताह यशस्वी केला.आणि शिक्षकांनी ही मेहनत घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रविण ठोंबरे यांनी सुंदर कार्यक्रम नियोजन केल्याबद्दल वनविभागाचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व स्वागत आदर्श शिक्षक श्री. जयसिंग बेटकर सर यांनी केले. व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक . अजय केंद्रे सर यांनी केले.

Post a Comment