संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
२०१९ विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत संपूर्ण श्रीवर्धन मतदार संघ व उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन यांच्या कार्यक्षेत्रात कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलीसांनी कंबर कसली आहे. त्याकरिता आचारसंहिता घोषीत झाल्यापासून ते मतमोजणीची प्रक्रिया होईपर्यंत श्रीवर्धन, म्हसळा व दिघी सागरी पोलीस ठाण्याअंर्तगत मोठया प्रमाणात पोलीस अधिकारी कर्मचारी तैनात केले आहेत . त्या अनुषगाने आज म्हसळा शहरांतील पाभरे नाका ते दिघी नाका या भागात उप विभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली रुट मार्च काढण्यात आला, यामध्ये म्हसळा पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर , श्रीवर्धन पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर, दिघी सागरीचे सपोनी महेंद्र शेलार, पोऊनी दिपक डूस पोलीस कर्मचारी, R.C. P.,माणगाव होमगार्ड असे सुमारे १०० जणाची तुकडी रुटमार्च साठी होती.
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून तालुक्यात चोख बंदोबस्त लावला जाणार आहे. निवडणुक काळात मतदारांना लुभावण्याचा अथवा धमकावण्याचा प्रयत्न केला जावू शकतो. त्याकरिता पैशासह बळाचा वापर होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे मतदारांना निर्भयपने मतदानाचा अधिकार बजावता यावा याकरिता पोलीसांकडून तालुक्यातील ७० मतदान केंद्राचा आढावा घेण्यात आला आहे.
अश्वनाथ खेडकर, पोलीस निरीक्षक, म्हसळा
निवडणुकीच्या अनुषंगाने श्रीवर्धन पोलीस उपविभागीय कार्यक्षेत्रातील श्रीवर्धन, म्हसळा, दिघी सागरी या तीनही पोलीस स्टेशन हद्दीत आवश्यक पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तावर नेमण्यात आले आहेत. त्याशिवाय नाकाबंदीत संशयीत वाहनांची झडाझडती घेण्यासह, फिरत्या पथकां मार्फत देखिल गैरकृत्यांवर नजर ठेवून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार आहे. मतदारांना निर्भयपने मतदान करता यावे यासाठी पोलीस पुर्णपने सज्ज आहेत.
बापूसाहेब पवार , उप विभागीय पोलीस अधिकारी, श्रीवर्धन

Post a Comment