श्रीवर्धन मध्ये मराठी संस्कृती प्रतिष्ठान ची अनोखी दिवाळी ; शिवकालीन किल्ल्यांचे विहंगम दृश्य

श्रीवर्धन मध्ये मराठी संस्कृती प्रतिष्ठान ची अनोखी दिवाळी ; बालगोपाल व तरुणांचा  उत्स्फूर्त प्रतिसाद : शिवकालीन किल्ल्यांचे विहंगम दृश्य

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते

भारतीय सण उत्सवात दिवाळीला  विशेष महत्त्व आहे .पारंपरिक वेशभूषा ,फटाक्यांची आतिषबाजी व विविध गोड पदार्थांची रेलचेल हे दिवाळी सणाचे वैशिष्ट्य अधोरेखित करते  .श्रीवर्धन शहरात मराठी संस्कृती प्रतिष्ठान ने दिवाळी सणाच्या सुट्टीत बालगोपाल व तरुण  मंडळी साठी किल्ले स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना चालना देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे .शहरातील सर्व पाखडीतील मुलांनी सदर च्या स्पर्धेत सहभागी होत दिवाळी सुट्टीचा आनंद लुटला आहे .श्रीवर्धन शहरांत आज ही मोठ्या प्रमाणात कौलारू घरे आहेत .घराच्या अंगणात मोकळ्या जागेवर मुलांनी किल्ल्यांची प्रतिकृती छान पणे तयार केली आहे .रायगड ,प्रतापगड ,पन्हाळा, पुरंदर , जलदुर्ग , व जंजिरा असे नावे मुलांनी किल्ल्यांना दिली आहेत .किल्ल्यांच्या निर्मिती साठी बालगोपालांनी घरातील टाकाऊ घटकांचा वापर केला आहे .तुटलेले गोणपाट , घर कामातून उरलेल्या विटा  , पाण्याचे सिंचन करण्यासाठी घरातील वापरात नसलेली टाकाऊ भांडी , सलाईन च्या नळ्या त्या सोबत गवताची निर्मिती करण्यासाठी  गहू व रांगोळीचा   उपयोग केला आहे .किल्ल्यांची उंची साधारणतः एक ते दोन फुट असून लांबी आठ ते दहा फूट पर्यंत ठेवलेली आहे .किल्ल्यावर भगवा ध्वज डौलाने फडकतांना दिसत आहे .किल्ल्यांवर शस्त्रधारी सैनिक जागता पहारा देत आहेत .तर काही किल्ल्यांवर अष्टप्रधान मंडळ व  छत्रपती शिवाजी महाराज आसनस्थ झाल्याचा देखावा मुलांनी तयार केला आहे .मराठी संस्कृती प्रतिष्ठाने आयोजित केलेल्या किल्ले स्पर्धे मुळे मुलांना सुट्टीत वेगळा विषय मिळाला त्या कारणे मुलं बऱ्याच वेळ टीव्ही व मोबाईल पासून दूर राहिली .त्या सोबत किल्ल्यांची प्रतिकृती निर्माण करण्यासाठी मुलांनी आपला इतिहास व इतिहासातील माणसे अभ्यासली आहेत .विद्यार्थ्यांमध्ये किल्ले स्पर्धे मुळे निश्चितच इतिहासा विषयी प्रेम निर्माण होत आहे  .अशा किल्ले स्पर्धे मुळे दिवाळी हा सण  पर्यावरण स्नेही साजरा  करण्या कडे  मुलांचा  कल वाढत आहे .मराठी प्रतिष्ठान च्या रशीष माने , रितेश मुरकर ,सुनील दर्गे व अतुल केमनाइक यांनी स्पर्धा आयोजनात महत्वाची भूमिका बजावली आहे .


लहान मुलांमध्ये इतिहासा विषयी ओठ निर्माण व्हावी व दिवाळी सण साजरा करताना मुलांनी पर्यावरणाच्या ऱ्हास होणार नाही या साठी जागरूक बनावे या साठी किल्ले स्पर्धेचे आयोजन आम्ही केले आहे .किल्ले स्पर्धा आयोजनाची आमची अनेक वर्षाची परंपरा आहे ......अमर गुरव (सभासद मराठी संस्कृती प्रतिष्ठान )
किल्ले स्पर्धेत सहभाग घेऊन आनंद झाला आहे .किल्ल्याची निर्मिती  घरातील विविध टाकाऊ पदार्थांचा वापर केला आहे .दिवाळीची  सुट्टी लागल्या पासून किल्ल्याची तयारी करत होतो .सुट्टीच्या काळात मित्रांच्या मदतीने किल्ल्या विषयी सर्व माहिती गोळा केली व त्याचा उपयोग करून किल्ला बांधला आहे ....दिग्विजय करंजकर (विद्यार्थी श्रीवर्धन )

 
मी या किल्ले स्पर्धेसाठी जंजिरा किल्ल्याची प्रतिकृती बनवली आहे .जंजिरा किल्ला श्रीवर्धन च्या जवळ आहे .मी जेव्हा किल्ला बनवण्यास सुरुवात केली आहे तेव्हा किल्ल्या विषयी सर्व घटकांची मला माहिती झाली यांचा आनंद आहे .या पूर्वी मला किल्ल्या विषयी विशेष असे काही माहीत नव्हते .....रोहित भोगलं ( विद्यार्थी श्रीवर्धन )

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा