प्राथमिक शाळा व अंगणवाडीचे लाईट बील ग्रामपंचायतीने भरावे : मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड.


प्राथमिक शाळा व अंगणवाडीचे लाईट बील ग्रामपंचायतीने भरावे : मुख्य कार्यकारी अधिकारी रायगड.
म्हसळयात C.E.O चा आदेश वाऱ्यावर
( म्हसळा ९ वार्ताहर )
रायगड जिल्ह्यातील व प्रत्येक तालुक्यातील बहुतांश शाळा या डीजीटल झाल्या आहेत, शाळांतील सर्व साधनांच्या वापरामुळे वीज बील ही बऱ्यापैकी येऊ लागले, बील शाळा व्यवस्थापनाने भरावे किंवा कसे अशी समस्या मुख्याध्यापक मंडळीना येऊ लागल्यावर रायगड जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे यानी सन्माननीय तोडगा काढून सदरची विज बिले ग्रामपंचायतीने भरावे असा आदेश जिल्ह्यातील सर्व तालुक्याना दिला म्हसळा तालुक्यात अद्यापही अनेक प्राथमिक शाळा व अंगणवाडयांची विज बीले थकीत आसल्याचे समजते. मुख्य कार्यकारी अधिकारी यानी २५/६/१९रोजीचे पत्रानुसार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम ४५(१)नुसार अनुसूची एक (ग्रामसूची) मध्ये नमूद केलेल्या विषयांबाबत वाजवी तरतुद करणे हे ग्रामपंचायतींचे कर्तव्य आहे. कलम ४५(३)नुसार पंचायतीस गावातील रहिवाशांचे आरोग्य, सुरक्षितता, शिक्षण,सुखसोयी, सोयी किंवा सामाजिक अथवा आर्थिक किंवा सांस्कृतिक कल्याण यांचे ज्यायोगे प्रवर्धन होऊ शकेल असे इतर कोणतेही काम किंवा उपाययोजना गावात पार पाडण्याचीही तरतुद करता येईल असे स्पष्ट आदेश देऊनही पंचायत समिती स्तरावर कारवाई झाली नसल्याचे समजते.
"म्हसळा तालुक्यात १३६ प्रा.शाळाना विजेचे कनेक्शन दिले आहे, थकीत बीला पोटी ४४ प्रा.शाळांचा विज प्रवाह कायम स्वरुपी बंद केला आहे, ४ प्रा.शाळांचा तात्पुरत्या स्वरुपात विजेचा प्रवाह बंद केला आहे."
श्री. धीरज बिराजदार ,उपअभियंता , म. रा. वि. वि.कंपनी. म्हसळा.

"शाळा डिजिटल झाल्या मात्र वीजपुरवठा खंडीत असल्याने विद्यार्थ्यांना ई लर्निंगचे धडे द्यायचे कसे? असा प्रश्‍न शिक्षकांना पडला आहे. "
प्रा. शिक्षक .

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा