संजय खांबेटे : म्हसळा
शालेय विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लागावी, यासाठी राज्यातील ३५ जिल्ह्यांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक शाळातून नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र शिक्षण विभागातील समग्र शिक्षा प्राथमिक विभागातून उभारण्यात येतात त्याच विभागातून म्हसळा तालुक्यात समग्र शिक्षांतर्गत २०१९-२० या शैक्षणिक वर्षात कांदळवाडा व तुरूंबाडी येथे नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारण्यात आली आहेत तसेच तालुक्यात २०१७-१८ खरसई व पाभरे,२०१८-१९ मेंदडी अशा एकूण ५ शाळांमध्ये नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र समग्र शिक्षा प्राथमिक विभागातून उभारण्यात आल्याचे गटसमन्वयक गजानन साळुंखे यानी सांगितले .
पूर्ण प्राथमिक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडक मराठी, उर्दू मध्यमांच्या शाळांत अतिरिक्त स्वतंत्र वर्गखोली, विद्युत सुविधा, शाळेची पटसंख्या आदी निकष लक्षात घेऊन नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्र उभारणीसाठी शाळांची निवड करण्यात येते , साधारणपणे शाळेत विद्युत जोडणी असलेली ५०० चौरस फूट आकाराची आरसीसी स्लॅब असणारी वर्गखोली व शाळेत गणित, विज्ञान विषयाच्या शिक्षकाची नेमणूक आवश्यक असते.
" प्राथमिक शाळा कांदळवाडासाठी विविध प्रकारची विज्ञानाची सुमारे रु १०लक्ष किमतीचे ५२० साहीत्य आले आहे, त्यामध्ये पृथ्वीवरील दिवस रात्र, न्यूटनची तबकडी, उष्णता प्रारण, धातुची विद्युत वाहकता, विविध ग्रहांवरील वजन असे अनेक प्रकार आहेत. शाळेतील विज्ञान शिक्षक शंकर परदेशी व उपा शिक्षक अश्विनी गुंडरे, मनिषा शिर्के, कासिम पठाण यांची मदत मिळत असल्याने विद्यार्थ्यांसोबतच काही पालकानासुद्धा आता विज्ञानाची गोडी लागली आहे"
शिवराम आडे, मुख्याध्यापक , प्रा .शाळा कांदळवाडा,ता. म्हसळा.
"शाळेत विज्ञान शिक्षक विज्ञान केंद्रात नवीन -नवीन प्रयोग मन लाऊन शिकवतात, यामुळे भविष्यात तालुका विज्ञान प्रदर्शनात आमच्या शाळेचा चांगला सहभाग असेल"
कुंजन पाखड व तेजस शिंदे.विद्यार्थी ८वी,
प्रा. शाळा कांदळ वाडा.
Post a Comment