फोटो :बाळ करडे यांचे स्वागत व सत्कार करताना
युवासेना अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याला म्हसळ्यातून हजारो युवा सैनीक जाणार.
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
रवीवार दि१५/९/२०१९ रोजी युवासेना अध्यक्ष तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद दौऱ्याचे निमित्ताने म्हसळा तालुका शिवसेना कार्यकारणी आणि युवासेना कार्यकारणीची संयुक्त बैठक तालुका प्रमुख महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात संपन्न झाली. यावेळी तालुक्यातील चारही गणांतून म्हसळ्यातून हजारो युवा सैनीक व शिवसैनिक जाणार आसल्याचे नियोजन करण्यात आल्याचे तालुका प्रमुख महादेव पाटील यानी सांगितले.बैठकीला तालुका युवा आधिकारी अमित महामुनकर,शहर प्रमुख मुन्ना पानसरे, माजी ता.प्रमुख नंदू शिर्के,रवी लाड, जेष्ठ शिवसैनिक सुभाष उर्फ बाळ करडे,उप तालुका प्रमुख अनंत कांबळे, विभाग प्रमुख गणू बारे,पांडुरंग बने,तुकाराम चाळके, सरपंच अनेत नाक्ती, माजी सरपंच संतोष जाधव ,अॅड. मुकेश पाटील,शाम कांबळे, अनिल महामुनकर, अनंत पाखड, प्रकाश शिगवण, संतोष सुर्वे, काप,पांडुरंग सुतार,सुरेश कुडेकर,कौस्तुभ करडे,नवाज काजी, राजेंद्र पदरत, आक्रम साने, रफी काजी, मुसद्दीक मुकादम, यावेळी नव्याने मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केलेले जेष्ठ शिवसैनिक सुभाष उर्फ बाळ करडे यांचे तालुका शिवसेनेच्या वतीने स्वागत व सत्कार करण्यात आला.

Post a Comment