प्रतिनिधी म्हसळा
रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यात सार्वजनिक वाचनालय येथे स्वराज्य प्रतिष्ठान रायगड चा सहावा वर्धापनदिन सोहळा नुकताच संपन्न झाला. संघटनेचे संस्थापक / अध्यक्ष मा.श्री.भास्कर भाई ना कारे यांच्या अध्यक्षतेखाली सोहळ्याचे आयोजन करण्यात आले, सदर कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज , ज्ञानज्योती महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्यसनमुक्तीची प्रतिज्ञा घेऊन करण्यात आली.
कार्यक्रमाला अनेक सामाजिक आणि राजकीय प्रमुख मान्यवर मंडळी , स्थानिक तालुका पातळीवर ग्रामस्थ मंडळी , विद्यार्थी वर्ग , तरुण मंडळी, महिला वर्ग , जेष्ठ-वरिष्ठ, पत्रकार ई उपस्थित होते उपस्थित प्रमुख मान्यवर यांना महापुरुषांची पुस्तके देऊन सन्मानित करण्यात आले तसेच त्यांनी संघटनेच्या सोहळ्यानिमित्ताने शुभेच्छा देवून वैयक्तिक मतांच्या निकषांवर उपस्थित मंडळी यांना संबोधित केले. त्याचबरोबर समाजात संघटनेच्या सभासदांनी रक्तादान करून लोकसेवा केली होती त्यांना सोहळ्यानिमित्ताने सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना संघटनेचे म्हसळा तालुका प्रमुख निकेश भेकरे यांनी वाचून प्रोजेक्टरच्या साह्याने आजपर्यंत संघटनेच्या माध्यमातून झालेल्या कार्याची छोटीशी फिल्म दाखवण्यात आली , गणेश काप आणि विक्रम पाजणे यांनी लिहिलेली कविता सादर केली त्यानंतर शिवव्याख्यात्या सपनाताई खांडेकर यांनी माँ साहेब जिजाऊ यांबद्दल मनोगत व्यक्त केले.
भास्करभाई कारे यांनी शिक्षणाच्या निकषांवर तरुणांची प्रगती अवलंबली असून भविष्यात न्याय-हक्क अधिकार हवे असतील तर राजकीय क्षेत्र सुद्धा तरुणांनी अंगीकृत करायला हवं अशा प्रकारचे मार्गदर्शन करत नियोजित केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा तरुण या व्याख्यानमालेच्या रूपाने प्रमुख वक्ते कु.रोशनदादा पाटील यांनी इतिहास समाजाला शहाणं बनविणारे महत्वाचे साधन आहे.
कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर उपस्थित कृष्णाजी कोबनाक साहेब भा. ज.पा रायगड जिल्हा अध्यक्ष, विनय कुमार सोनावणे निर्मूलन समिती ,सचिन करडे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा अध्यक्ष,युवप्रबोधनकार रोशनदादा पाटील, सपनाताई खांडेकर, महेश जाधव बहुजन क्रांती मोर्चा रायगड जिल्हा अध्यक्ष , प्रसन्न निजामपूरकर, गणेश बोर्ले, संजय खांबेटे पत्रकार,जयशिंग बेठकर, सहादेव बटावले आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आंबवले यांनी केले तर शांताराम रेवाळे यांच्या आभार प्रदर्शनानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment