म्हसळा तालुक्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध विकास कामे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन
संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
आज सोमवार दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी मौजे खामगांव येथे बाल स्मशान भूमिकड़े जाणारा रस्ता , गौळवाडी खामगांव वाडी रस्ता तयार करणे,वलाझारवाडी येथे रस्ता तयार करणे, संदेरी येथे घाट बांधणे,मौजे संदेरी होळीकड़े जाणारा रस्त्यावर साकव बांधणे, संदेरी येथे अंतर्गत रस्ता ,पाभरे चाफेवाडी चिचोंडे रस्ता ईत्यादी कामांचे भूमीपूजन व उद्घाटन कार्यक्रम .कृष्णा कोबनाक अध्यक्ष श्रीवर्धन विधानसभा तथा सदस्य जिल्हा नियोजन समिती यांच्या हस्ते संपन्न झाले. मंगळवार दिनांक १७ सप्टेंबर २०१९ रोजी सेवा स्वच्छता अभियाना अर्तगत स्वच्छता अभियान म्हसळा ग्रामीण रुग्णालय येथे स्वच्छता अभियान म्हसळा तालुक्यात विविध ठिकाणी विकास कामे ,भूमिपूजन व उद्घाटन , रुग्णाना व विद्यार्थ्याना फळ वाटप व स्वच्छता मोहिम होणार आसल्याचे तालुका अध्यक्ष शैलेश पटेल व सरचिटणीस प्रकाश रायकर, तुकाराम पाटील यानी कळविले आहे.

Post a Comment