श्री. दिनेश रांगळे सर यांच्या सत्काराचे आयोजन..



प्रतिनिधी म्हसळा लाईव्ह
                 दि. १७ सप्टेंबर २०१९ रोजी रा.जि.प. कन्या शाळा म्हसळा येथे  तालुक्यातील जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. दिनेश रांगळे सर यांचा मित्र परिवारातर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
                    श्री. धामणकर सर यांच्या अध्यक्षतेखाली सदर कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी संपूर्ण मित्रपरिवारातर्फे सत्कारमुर्ती श्री. दिनेश रांगळे सर यांना शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.
                    यावेळी या कार्यक्रमासाठी केंद्रप्रमुख धामणकर सर, अलिबाग सोसायटीचे संचालक नरेश सावंत सर, पेण सोसायटीचे उल्डे सर, मुख्याध्यापक किरण पाटील सर, मोरे सर, दिपक पाटील सर, बिचुकले सर, व इतर शिक्षकवृंद उपस्थित होते.
                    यावेळी रांगळे सर यांनी म्हसळा तालुक्यातील केलेल्या सेवा शाळा तुरुंबाडी, खरसई, बनोटी, निगडी, या शाळांमध्ये उत्कृष्ट अध्यापन, विविध उपक्रम, सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रिडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात केलेले कार्य वाखाणण्याजोगे आहे, असे सर्व शिक्षक मित्रांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले.
                    या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन खटके सर यांनी केले व आभार प्रदर्शन बिचुकले सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा