"गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौकर या"च्या गजरात म्हसळा शहरासह तालुक्यातील गणपतीचे विसर्जन


संजय खांबेटे : म्हसळा प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा आपल्या गावी जाण्यासाठी परत निघणार या आनंदात शहरांतील भाविकांची मोठी गर्दी
गणपती विसर्जन मिरवणुकीत होती, विसर्जन मिरवणुकीचे सुरवातीपासून पावसांची संतत धार सुरू होती. 

मोठ-मोठया गणेश मूर्ती आसल्याने ट्रॅक्टर जिपच्या सहाय्याने मिरवणूक व विसर्जन करण्यांत आले गौळवाडी, कुंभारवाडा, वारे कोंड, सोनार- तांबट आळी , विद्यानगरी ,दिघी नाका ,या भागातील गोर बंजारा समाज सामाजिक मंडळाचा एक सार्वजनिक व भाई बोरकर, नंदू गोविलकर, सचिन शेट्ये,विशाल सायकर, गजानन करंबे, दिपा करडे,अमर करंबे,सुशिल यादव, प्रविण करडे,सुदाम कुडतुडकर, विशाल साळुंखे, रामचंद्र खताते, नितीन दर्गे,रमेश खताते, दत्ता सुर्वे, संतोष जगताप, दिलीप शिर्के, गणेश बिरवाडकर , चंदूशेठ कापरे यांच्या खाजगी गणपतींचे आज प्रचंड उत्साहात विसर्जन झाले. ग्रामिण भागातील खारगाव (बु) सारख्या छोट्या गावांत सर्व मूर्ती मंदीरात आणून , होळीच्या मैदानात महीला, युवक- युवती फेर धरून गाणी , "गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लौकर या" या गजराने एकत्रित बंदरावर विसर्जन करण्यात आले . 

शहरासह तालुक्यात १सार्वजनीक व ८४० खाजगी गणपतींचे आज विसर्जन झाले. वाद्य, वाजंत्री , ढोल -ताशा, खालू बाजामुळे मिरवणुकीत सर्वच भाविकाना विशेष उत्साह आला होता, युवक -युवती, महीला प्रचंड उत्साहात बहुतांश मिरवणुकीत सामिल झाल्या होत्या. Dy. Sp. बापूसाहेब पवार नवनियुक्त पोलीस निरीक्षक अे.जी.खेडकर व पोलीस अधिकारी दिपक डूस व कर्मचाऱ्यानी चोख बंदोबस्त ठेवला होता.


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा