श्रीवर्धन तालुक्यातील साखरोणे रस्ता खड्डेमय ; जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याचे दुर्लक्ष



साखरोणे श्रीवर्धन मार्गावरील वाहतुकीवर होणार परिणाम

श्रीवर्धन प्रतिनिधी संतोष सापते 

निवडणुकीच्या काळात आश्वासनाचा जोरदार पाऊस पडतो व निवडणूक समाप्ती नंतर मात्र आश्वासन कर्त्यांना त्याचा विसर पडतो .श्रीवर्धन तालुक्यातील साखरोणे रस्त्याची अतिशय वाईट  अवस्था  झाली आहे  .मात्र जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने त्याच्या कडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे .त्याचा परिणाम साखरोणे मार्गे श्रीवर्धन कडे होणाऱ्या वाहतुकीवर होत आहे .
साखरोणेची लोकसंख्या 750 च्या जवळपास आहे .गावातील तरुण वर्ग रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात मुंबई मध्ये वास्तव्यास आहे . गावातील वाहतुकीचे एकमेव साधन एस टी आहे .दिवसभरात   साखरोणे मार्गे म्हसळा व साखरोणे मार्गे श्रीवर्धन अशा चार फेऱ्याची एस टी ची वाहतुक नियमित केली जाते .साखरोणे  हे    गाव म्हसळा पासून 21किलोमीटर व श्रीवर्धन पासून 15 किलोमीटर अंतरावर आहे .  साखरोणे गावातून शालेय विद्यार्थी , रोजनदारीवर काम करणारे रोजगार व जेष्ठ नागरिक श्रीवर्धन कडे नियमित प्रवास करतात .रस्त्याच्या दुरावस्थे मुळे सर्व लोकांना प्रवास करताना अतिशय त्रास होत आहे .साखरोणे रस्त्याचा उपयोग वडशेत वावे , धारवली , कोळे , तळवडे , कोंझरी या गावातील लोक दळणवळणासाठी करतात .साखरोणे गावातील  सर्व सामान्य माणसाला होणारा त्रास सर्व पक्षीय  राजकीय नेतृत्वाच्या  निदर्शनांस येत नाही असे दिसून येत आहे .


Post a Comment

Previous Post Next Post

नक्की वाचा