म्हसळा (निकेश कोकचा )
म्हसळा तालुक्यातील कांदळवाडा गावातील पांडूरंग भिकू रेवाळे या ६० वर्षाच्या वृद्धाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली. रेवाळे हे घरामध्ये एकटेच राहत होते. तर त्यांचा कुटूंब कामा निमित्त मुंबई येथे असतो. रेवाळे यांच्या आत्महत्येचा कारण अदयाप स्पष्ठ झाला नसला तरी, हि आत्महत्या घरगुती वादातून झाल्याचा पोलिसांचा संशय आहे. रेवाळे यांना शवविच्छेदना साठी म्हसळा ग्रामिण रुग्णालयात नेण्यात आले होते. सदर घटनेचा अधिक तपास पो.ना. वैभव पाटील हे करीत आहेत.

Post a Comment